मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Father's Day 2024: वडिलांसाठी तुम्हीही घरीच बनवू शकता हे खास पदार्थ, दिवस होईल आणखी स्पेशल

Father's Day 2024: वडिलांसाठी तुम्हीही घरीच बनवू शकता हे खास पदार्थ, दिवस होईल आणखी स्पेशल

Jun 15, 2024 10:54 PM IST

Father's Day Special: रविवार, १६ जूनला फादर्स डे साजरा केला जाणार आहे. हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांसाठी काही पदार्थ बनवू शकता. येथे पाहा काही खास पदार्थ

फादर्स डे साठी खास डिशेस
फादर्स डे साठी खास डिशेस

Special Dishes for Father's Day: उद्या म्हणजेच १६ जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. कुठलाही दिवस खास बनवण्यासाठी थोडं सेलिब्रेशन करणं गरजेचं असतं. हा प्रसंग खास बनवायचा असेल तर स्वत: स्वयंपाकघरात जाऊन वडिलांसाठी काहीतरी खास पदार्थ तयार करा. सेलिब्रेशसाठी फक्त केकच नाही तर तुम्ही हे काही खास पदार्थ सुद्धा बनवू शकता येथे काही पदार्थ आहेत जे तुम्ही सहज तयार करू शकता. हे खरोखरच वडिलांचा दिवस खास बनवतील.

ड्राय चिली पनीर

पनीरपासून वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात. ते चवीने जबरदस्त आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. हे खाण्याचे अनेक फायदे आहेत. फादर्स डेला तुम्ही तुमच्या वडिलांसाठी ड्राय चिली पनीर तयार करू शकता. कांदा आणि हिरवी, लाल व पिवळी शिमला मिरची घालून ते तयार केले जाते. त्याची चव वाढवण्यासाठी पनीरचे तुकडे आधी तांदळाच्या पिठाच्या बॅटरमध्ये पनीरचे तुकडे घाला आणि नंतर तळून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

तवा पुलाव

फादर्स डेला तुम्ही तुमच्या वडिलांसाठी तवा पुलाव देखील बनवू शकता. हे भरपूर भाज्या आणि मसाल्यांसह तयार केले जाते. जर तुमच्या वडिलांना मसालेदार जेवणाची आवड असेल तर त्यांना ते नक्कीच आवडेल. पुलावला आणखी चव हवी असेल तर तुम्ही भाज्या भाजल्यावर त्यात थोडे दही घालू शकता.

हरा भरा कबाब

हे कबाब तुम्ही हिरवे वाटाणे आणि पालकसोबत बनवू शकता. हा देखील एक हेल्दी आणि चवदार पदार्थ आहे. आपण ते पटकन तयार करू शकता. ते सजवण्यासाठी काजू नक्की लावा.

फ्राइड इडली

जर तुम्ही पहिल्यांदाच काही बनवत असाल तर तुम्ही फ्राइड इडली बनवू शकता. ते बनवण्यासाठी इडलीचे मध्यम आकाराचे तुकडे करा. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि काही मसाले घालून परतून घ्या. तसेच चांगल्या चवीसाठी त्यात कढीपत्ता आणि शेंगदाणे घालावे.

WhatsApp channel
विभाग