Father's Day Recipe: फादर्स डेला बाबांसाठी बनवा खास एग्लेस चॉकलेट केक, सोपी आहे रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Father's Day Recipe: फादर्स डेला बाबांसाठी बनवा खास एग्लेस चॉकलेट केक, सोपी आहे रेसिपी

Father's Day Recipe: फादर्स डेला बाबांसाठी बनवा खास एग्लेस चॉकलेट केक, सोपी आहे रेसिपी

Published Jun 15, 2024 12:38 PM IST

Father's Day 2024 Special: या फादर्स डेला जर तुम्हाला तुमच्या वडिलांसाठी काहीतरी खास बनवायचे असेल तर एग्लेस चॉकलेट केकची ही टेस्टी रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी तुमच्या नात्यात गोडवा भरेल.

एग्लेस चॉकलेट केकची रेसिपी
एग्लेस चॉकलेट केकची रेसिपी (unsplash)

Eggless Chocolate Cake Recipe: प्रत्येक बाप आपल्या मुलांचं आयुष्य खास बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतो. पण वर्षभरात एक दिवस असा येतो जेव्हा मुले आपल्या वडिलांना आनंदी करू शकतात. आणि हा खास दिवस म्हणजे फादर्स डे. दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षी हा खास दिवस १६ जून रोजी साजरा केला जाणार आहे. या फादर्स डेला जर तुम्हाला तुमच्या वडिलांसोबतचं नातं अधिक घट्ट करायचं असेल आणि नात्यात गोडवा भरायचं असेल तर घरी एग्लेस चॉकलेट केकची ही टेस्टी रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी फॉलो करून तुम्ही एगलेस चॉकलेट केक अगदी सहजपणे घरी बनवू शकता. चला तर मग बाबांचा फादर्स डे खास बनवण्यासाठी एग्लेस चॉकलेट केक कसा बनवायचा जाणून घ्या.

एग्लेस चॉकलेट केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- ३/४ कप मैदा

- १/३ कप कोको पावडर

- १/३ कप गरम पाणी

- १/३ कप व्हेजिटेबल ऑइल

- १/२ कप दही

- ३/४ कप कॅस्टर शुगर

- १ टीस्पून कॉफी पावडर

- १/२ कप बेकिंग पावडर

- १/४ कप बेकिंग सोडा

एग्लेस चॉकलेट केक बनवण्याची पद्धत

एगलेस चॉकलेट केक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात कोको पावडर आणि कॉफी पावडर घालून चांगले मिक्स करा. याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. आता या मिश्रणात साखर, दही आणि व्हेजिटेबल ऑइल घालून चमच्याच्या साहाय्याने थोडा वेळ फेटत राहा. तुम्हाला हवं असेल तर या वेळी तुम्ही केकच्या पिठात तूप किंवा लोणीही घालू शकता. पिठाला थोडा वेळ फेटल्यानंतर त्यात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मैदा मिक्स करा आणि पुन्हा फेटून घ्या. 

आता हे पीठ मायक्रोवेव्हमध्ये ६ मिनिटे ठेवा. तुमचा टेस्टी, स्पंजी केक तयार आहे. या केकवर चॉकलेट सिरप, चॉकलेट टाकून तुम्ही गार्निश करा आणि सर्व्ह करा. 

Whats_app_banner