मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Father's Day Wishes: वडिलांना 'फादर्स डे' च्या द्या खास शुभेच्छा! त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतील हे संदेश

Father's Day Wishes: वडिलांना 'फादर्स डे' च्या द्या खास शुभेच्छा! त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतील हे संदेश

Jun 14, 2024 08:43 PM IST

Happy Father's Day: यावर्षी फादर्स डे १६ जून रोजी साजरा केला जाईल. तुम्हालाही या खास प्रसंगी तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे असेल तर त्यांना हे खास शुभेच्छा संदेश पाठवा.

फादर्स डेच्या शुभेच्छा संदेश
फादर्स डेच्या शुभेच्छा संदेश (unsplash)

Father's Day 2024 Wishes, Messages: असे म्हटले जाते की जगात आईची जागा दुसरी कोणीही घेऊ शकत नाही. परंतु मुलांसाठी वडिलांशिवाय त्याच्या आयुष्याची कल्पना करणे फार कठीण आहे. बाहेरून कणखर आणि आतून मऊ अशा वडिलांसमोर बहुतेक मुलांना आपल्या भावना उघडपणे मांडता येत नसतील. पण आईबरोबरच वडिलांजवळ सुद्धा मुलांचे चेहरे वाचण्याचे कौशल्य असते. यामुळेच प्रत्येक मुलासाठी त्याचे वडील सुपरहिरो असतात. वडील आणि मुलामधील या अनमोल नात्याला आणखी घट्ट करण्यासाठी दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षी १६ जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. तुम्हालाही या खास प्रसंगी तुमच्या वडिलांना खास फिल द्यायचे असेल, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे असेल तर हे सुंदर फादर्स डेचे संदेश त्यांना पाठवा.

फादर्स डेच्या शभेच्छा संदेश

आयुष्य खूप मोठं असलं

ट्रेंडिंग न्यूज

तरी चिंता खूप आहेत

पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे

म्हणूनच ते सहन करण्याची शक्ती मिळत आहे

फादर्स डेच्या शुभेच्छा!

 

खिसा रिकामा असूनही

त्यांनी कधी नकार दिला नाही

माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती

मी कधी पाहिला नाही

फादर्स डेच्या शुभेच्छा!

 

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन

स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून

मुलांसाठी झटणारं अंतःकरण

फादर्स डेच्या शुभेच्छा!

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती

जी तुम्हाला जवळ घेते जेल्हा तुम्ही रडता

तुम्हाला ओरडते जेल्हा तुम्ही एखादी चूक करता

तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता

आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्ही तुम्ही हरता

फादर्स डेच्या शुभेच्छा!

 

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे

कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार

माझ्या प्रत्येक कामात, विचारात

तु्म्हाला घेऊन आजही मी ठाम आहे

फादर्स डेच्या शुभेच्छा!

 

मला सावलीत बसून

स्वतः जळत राहिले

असे एक देवदूत

मी वडिलांच्या रुपात पाहिले

Happy Father's Day!

बाप म्हणजे कोण असतं

हरवलेल्या पाखराचं छत्र

अन् बिथरलेल्या आवाजाचं पत्रं असतं....

फादर्स डेच्या शुभेच्छा!

 

तुम्ही दिलेला वेळ

तु्म्ही घेतलेली काळजी

आणि तुम्ही दिलेले प्रेम

याची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही

फादर्स डेच्या शुभेच्छा!

 

मुलं कितीही मोठे झालेत तरीही

असा एकमेव माणूस ज्याच्याकडे

ते मोठा माणूस म्हणूनच पाहणार

आणि ते म्हणजे तुमचा बाबा...

फादर्स डेच्या शुभेच्छा!

झोप आपली विसरुन झोपवले आम्हाला

अश्रू आपले पाडून हसवले आम्हाला

कडेवर घेऊन खेळवले आम्हाला

जीवनातील प्रत्येक सुख दिले वडिलांना आम्हाला

फादर्स डेच्या शुभेच्छा!

WhatsApp channel