Places To Visit on Father's Day: फादर्स डे हा मुले आणि वडील यांच्यातील नाते साजरा करण्याचा दिवस मानला जातो. जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. यावर्षी १६ जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. तसं तर प्रत्येक दिवस पालकांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी खास असतो. पण जर तुम्हाला या दिवशी तुमच्या वडिलांना खास फिल करून देण्यासाठी तुम्ही त्यांना गिफ्ट म्हणून कुठेतरी घेऊन जाऊ शकता. ही एक चांगली संधी आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांसोबत चांगला वेळ घालवू शकता. पहा, फादर्स डेच्या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या वडिलांसोबत कोणत्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.
या कडक उन्हात तुम्हाला कमी गर्दीच्या ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांसोबत काश्मीरला जाण्याचा प्लॅन करू शकता. आपण हवे असेल तर तुम्ही तुमच्या पालकांना म्हणजे आई-वडिलांना ट्रीपवर पाठवू शकता. असे केल्याने त्यांना एकांतात वेळ घालवण्याची संधी मिळेल. हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही नद्या, धबधबे, दऱ्या आणि हिरव्यागार जंगलांच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणांना भेट देऊन तुमचे मन प्रसन्न होईल.
वडिलांसोबत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी गोवा हे उत्तम ठिकाण आहे. हे एक अद्भुत ठिकाण आहे जिथे भेट देण्याचा एक वेगळाच आनंद असतो. बहुतेक परदेशी पर्यटक या ठिकाणी फिरायला येतात. कारण हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातील इतर देशांतूनही अनेक पर्यटक येथे मौजमजा करण्यासाठी येतात. येथे भेट देण्यासारखे बरेच ठिकाण आहे, ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता.
तुमच्या वडिलांना मसुरी आणि जवळच्या ठिकाणांवर फिरायला घेऊन जा. हे छोटेसे गाव अजूनही शहरी जीवनापासून पूर्णपणे दूर आहे. अशा परिस्थितीत हे ठिकाण अनुभवणे खूप मजेदार असेल. मसुरी हे देखील एक उत्तम ठिकाण आहे, या ठिकाणाला पर्वतांची राणी म्हणतात. येथील केम्पटी फॉल धबधबा सर्वात प्रसिद्ध आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या