मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Father's Day Gift: यंदाच्या फादर्स डे ला वडिलांना द्या हे विशेष गिफ्ट, त्यांचा दिवस होईल आणखी खास

Father's Day Gift: यंदाच्या फादर्स डे ला वडिलांना द्या हे विशेष गिफ्ट, त्यांचा दिवस होईल आणखी खास

Jun 12, 2024 11:36 PM IST

Father's Day 2024: पुस्तकांपासून ते रोपांपर्यंत, येथे काही गिफ्ट्स आहेत, जे तुम्ही फादर्स डे ला वडिलांना देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकता.

फादर्स डे साठी गिफ्ट आयडिया
फादर्स डे साठी गिफ्ट आयडिया (Pexels)

Thoughtful Gift Ideas for Dad: वडिल हे आपले सर्वात मजबूत आधारस्तंभ आहेत. काहीही झालं तरी ते आपल्या पाठीशी उभे राहतात. ते एक प्रकारे आपल्या पंखातील बळ आहेत आणि आपल्या ध्येयाकडे प्रयत्न करण्यासाठी आपल्याला सतत पाठिंबा देतात. वडील शांतपणे आपल्यावर प्रेम करतात आणि आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवतात. आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यात वडिलांचा सिंहाचा वाटा असतो. लहानपणी सायकल चालवायला शिकवणं असो किंवा मोठं झाल्यावर आपल्या स्वप्नांना पाठिंबा देणं असो, आपले वडील आपले सर्वात मोठे चीअरलीडर असतात. आपल्या वडिलांनी आपल्यावर दाखवलेल्या प्रेमाची आणि विश्वासाची, आपल्याला यशस्वी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची, आणि कठीण काळात आपल्याला आधार देण्याची त्यांची भूमिका या सर्वांसाठी त्यांचा दररोज सन्मान करायला हवा. दरवर्षी, फादर्स डे आपल्या वडिलांचा आणि ते आपल्यासाठी जे काही करतात त्यांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

१६ जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. आपल्या वडिलांना स्पेशल फिल देण्याचा आणि त्यांच्यावर भरपूर गिफ्ट्स, आपुलकी आणि प्रेमाचा वर्षाव करण्याचा हा दिवस आहे. आपण हा विशेष दिवस साजरा करताना वडिलांना काही खास गिफ्ट देऊ शकता. याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल आणि त्यांचा दिवस आणखी खास होईल.

ट्रेंडिंग न्यूज

फादर्स डे साठी गिफ्ट आयडिया

पुस्तके

तुमचे वडील पुस्तकी किडे आहेत का? तुम्ही त्यांना नेहमीच पुस्तक वाचताना पाहिले आहे का? मग पुढे विचार करू नका, कारण तुमच्या वडिलांना पुस्तकापेक्षा आनंद इतर कोणतीही गोष्ट देऊ शकत नाही. त्यांच्या पुस्तकाची बकेट लिस्ट पहा आणि त्यांना ते पुस्तक भेट द्या, जे ते बऱ्याच काळापासून वाचण्याची अपेक्षा करत होते.

फुले

सकाळी उठल्याबरोबर वडिलांना फुले किंवा बुके द्या. फुलांच्या माध्यमातून तुम्ही त्यांचा दिवस खास बनवू शकता आणि त्यांच्यामुळे तुमचे आयुष्य किती खास आहे हे कळेल. त्यांच्या आवडीच्या फुलांचा गुच्छ बनवा आणि त्यांना सरप्राईज द्या.

रोड ट्रिप

कल्पना करा की आपल्या वडिलांसोबत रोड ट्रिपवर जाणे आणि त्यांच्यातील तरुण व्हर्जन पाहणे, निसर्ग सौंदर्य पाहणे हे सर्व किती उत्साही असू शकते. एक परफेक्ट प्लेलिस्ट तयार करा आणि आपल्या वडिलांसह ड्राइव्हवर जा.

रोपं

तुमच्या वडिलांना बागकामाची आवड आहे का? मग त्यांना रोपं भेट देणं ही सर्वोत्तम भेट ठरेल. कारण खरं सांगायचं तर बागकाम करणाऱ्या वडिलांकडे रोपं कधीच जास्त होत नाही. हे त्यांचा दिवस आणखी खास बनवतील.

केक

आधीच केक बेक करा आणि फादर्स डेच्या दिवशी आपल्या वडिलांना गिफ्ट करा. केक कापताना त्यांच्या चेहऱ्यावरील सर्वात सुंदर हास्याचा आनंद घ्या.

WhatsApp channel