Father's Day 2024: वाढत आहे कार्डियाक अरेस्टचे प्रमाण, अशी घ्या वडिलांच्या तब्येतीची काळजी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Father's Day 2024: वाढत आहे कार्डियाक अरेस्टचे प्रमाण, अशी घ्या वडिलांच्या तब्येतीची काळजी

Father's Day 2024: वाढत आहे कार्डियाक अरेस्टचे प्रमाण, अशी घ्या वडिलांच्या तब्येतीची काळजी

Jun 15, 2024 08:29 PM IST

Father's Day Health Tips: फादर्स डेला तुम्हालाही आपल्या वडिलांसाठी काही खास करायचं असेल तर आपल्या बाबांचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

वडिलांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी टिप्स
वडिलांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी टिप्स (unsplash)

Lifestyle Tips for Dad to Keep Heart Healthy: व्यस्त जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या बिघडलेल्या सवयी आणि गतिहीन जीवनशैलीमुळे आजकाल लोकांमध्ये कार्डियाक अरेस्ट वाढत आहे. हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान ऑक्सिजनयुक्त रक्त त्या व्यक्तीच्या मेंदूत आणि इतर अवयवांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी, रुग्णाला तातडीने उपचार न मिळाल्यास तो बेशुद्ध पडू शकतो किंवा मृत्यूही होऊ शकतो. व्यक्तीचे लिंग आणि वय काहीही असो, त्याने दीर्घ निरोगी आयुष्यासाठी आपल्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलांपेक्षा पुरुषांना अचानक कार्डियाक अरेस्ट येण्याची शक्यता जास्त असते. दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदा हा दिवस १६ जून रोजी साजरा केला जाणार आहे. अशावेळी फादर्स डेला तुम्हालाही आपल्या वडिलांसाठी काही खास करायचं असेल तर त्यांचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

नियमित व्यायाम करा

नियमित शारीरिक व्यायामामुळे हृदय निरोगी राहते. या फादर्स डेपासून बाबांना रोज काही वेळ चालणे, सायकल चालवणे किंवा पोहणे यासारखे व्यायाम करण्यास प्रवृत्त करा. किमान ३० मिनिटे नियमित व्यायाम केल्याने वजन कमी होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि हृदयाचे स्नायू बळकट होतात.

पौष्टिक आहार

हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा. वडिलांना फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, लीन प्रोटीन आणि एवोकॅडो आणि नट्स सारखे हेल्दी फॅट खाण्यास सांगा. अशा आहारात सर्व आवश्यक पोषक तत्वे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन नियंत्रणाबरोबरच कोलेस्टेरॉल वाढण्यास आणि हृदयविकार टाळण्यास मदत होते.

तणावापासून दूर राहा

जास्त तणावामुळे हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशावेळी बाबांना टेन्शन फ्री ठेवण्यासाठी स्ट्रेस मॅनेज करण्याचे मार्ग अवलंबा. ज्यामध्ये तुम्ही रिलॅक्स करण्यासाठी त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत गेट टुगेदर प्लॅन करू शकता किंवा रुटीनमध्ये योगाभ्यास सुरु करू शकता. तणाव कमी केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो.

धुम्रपानापासून दूर राहा

जर तुमचे वडील धूम्रपान करत असतील तर त्यांना धूम्रपान सोडण्यास सांगा. तंबाखू हे हृदयरोगाचे मुख्य कारण आहे. ते सोडण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाऊ शकते, जे निकोटीन रिप्लेसमेंट औषधे देऊन धूम्रपान सोडण्यास मदत करू शकतात. धूम्रपान सोडल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयरोगाची शक्यता कमी होते.

रक्तदाब नियंत्रणात ठेवा

हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब हृदयरोगाचे प्रमुख कारण बनू शकते. जीवनशैलीत बदल करून रक्तदाब नियंत्रित करता येतो. या बदलांमध्ये पौष्टिक आहार, नियमित व्यायाम, तणाव कमी करणे आणि आवश्यकतेनुसार औषधे घेणे समाविष्ट आहे. फादर्स डेला बाबांना बीपी नियंत्रणात ठेवायला सांगा. गरज भासल्यास डॉक्टरांची मदत घ्या.

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवा

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी घरातील ग्लुकोमीटरची मदत घ्या. याच्या मदतीने रक्तातील साखर तपासता येते. ज्याद्वारे मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. याशिवाय मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि वजनावर नियंत्रण ठेवा.

नियमित तपासणी करा

हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित तपासणी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या वडिलांना नियमितपणे डॉक्टरांकडे जाण्यास सांगा आणि तपासणी करा. यामुळे कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि हृदयविकाराचे वेळीच निदान होऊ शकते. वेळीच निदान करून हृदयरोग वाढण्यापासून रोखता येतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner