मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Father's Day 2024: हायकिंग असो वा मूव्ही मॅरेथॉन, फादर्स डे खास बनवण्यासाठी पाहा यूनिक आयडिया

Father's Day 2024: हायकिंग असो वा मूव्ही मॅरेथॉन, फादर्स डे खास बनवण्यासाठी पाहा यूनिक आयडिया

Jun 13, 2024 11:52 PM IST

Father's Day 2024: एकत्र बसून चित्रपट पाहण्यापासून ते एखादे गिफ्ट देण्यापर्यंत फादर्स डे अनोख्या पद्धतीने साजरा करण्याच्या येथे काही आयडिया आहेत.

फादर्स डे साजरा करण्यासाठी यूनिक आयडिया
फादर्स डे साजरा करण्यासाठी यूनिक आयडिया (Unsplash)

Unique Ideas to Celebrate Father's Day: वडील हे आपल्या आयुष्यातील सुपरहिरो असतात. आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी ते जगाच्या शेवटापर्यंत जाऊ शकतात. ते आपल्यावर प्रेम करतात, आपले संगोपन करतात, आपले रक्षण करतात आणि त्याहीपेक्षा आपल्या पंखांना बळ देतात. आपण जे जीवन पाहतो ते आपल्याला देण्यासाठी ते शांतपणे धडपडत असतात. ते आपले सर्वात मोठे चीअरलीडर्स असतात, आणि जेव्हा परिस्थिती बिघडते तेव्हा ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. खरं तर प्रत्येक दिवस हा वडिलांचा असतो. फादर्स डे आपल्या वडिलांप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्याचे आणि ते आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत हे त्यांना सांगण्यासाठी समर्पित आहे. १६ जून रोजी फादर्स डे साजरा करण्यासाठी येथे काही यूनिक आयडिया आहेत.

हायकिंग

आपल्या वडिलांसोबत रॅकसॅक पॅक करा आणि ज्या डोंगराळ रस्त्यांवरून त्यांना फिरायचे आहे तेथे प्रवास करण्याची कल्पना करा. कल्पना करा की त्या निखळ रस्त्यांवरून चालणे, हेअरपिन पार करणे, त्यांच्यासोबत विनोदांवर हसणे आणि टेकड्यांच्या पाठीमागून उगवणाऱ्या सूर्याच्या सुंदर दृश्याचा आनंद घेणे. या फादर्स डेला तुमच्या वडिलांचे स्वप्न सत्यात आणा.

ट्रेंडिंग न्यूज

मूव्ही मॅरेथॉन

जर तुमचे वडील नेहमी ज्या सिनेस्टारचे कौतुक करत होते, ते अभिनेते, अभिनेत्री त्यांना अजूनही आवडत असतील तर जास्त विचार करू नका. त्याच्या आवडत्या चित्रपटांच्या डीव्हीडीचे कलेक्शन मिळवा आणि कुटुंबासह एकत्र पहा. त्यांना डायलॉग रिपीट करताना पहा आणि विनोदांवर हसताना पहा. या मार्गाने तुम्ही त्यांचा दिवस खास बनवू शकता.

पपी भेट द्या

तुमच्या वडिलांना कुत्रे किंवा पेट आवडत असेल तर तुम्ही त्यांना पपी भेट देऊ शकता. त्याच्यासोबत दिवस घालवून वडिलांचा दिवस सुद्धा खास होईल आणि हे त्यांच्यासाठी परफेक्ट गिफ्ट ठरेल.

मॅरेथॉन धावणे

तुमचे वडील आरोग्याविषयी जागरूक आहेत का? तसे नसेल तर त्यांना त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. वडील आयुष्यभर आपलं आयुष्य चांगलं करण्यासाठी काम करतात आणि या प्रक्रियेत स्वतःची काळजी घ्यायला विसरतात. या फादर्स डेला, आपल्या वडिलांसोबत मॅरेथॉन धावा आणि त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सुरवात करताना पहा.

एकत्र डान्स व्हिडिओ बनवा

कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र करा आणि आपल्या वडिलांच्या आवडत्या गाण्याच्या डान्स स्टेप्सचा सराव करा. त्यांनाही सोबत घ्या आणि एकत्र डान्स व्हिडिओ बनवा. हे बनवताना मजा येईल तसेच एकत्र आनंदी वेळ घालवता येईल.

 

WhatsApp channel