Fashion Hacks: तुमचीही उंची कमी आहे? मग कपडे निवडताना घ्या 'ही' काळजी, दिसाल उंच-fashion trends how to choose clothes for short girls to look taller ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fashion Hacks: तुमचीही उंची कमी आहे? मग कपडे निवडताना घ्या 'ही' काळजी, दिसाल उंच

Fashion Hacks: तुमचीही उंची कमी आहे? मग कपडे निवडताना घ्या 'ही' काळजी, दिसाल उंच

Aug 22, 2024 02:30 PM IST

Fashion tips for short girls: आज आम्ही तुम्हाला अशाच काही फॅशन हॅक्सबद्दल सांगत आहोत, ज्या कमी उंचीच्या मुलींसाठी खूप उपयुक्त ठरतील.

कमी उंचीच्या लोकांनी कसे कपडे निवडावे
कमी उंचीच्या लोकांनी कसे कपडे निवडावे (pexel)

choose clothes for short girls to look taller: मुली आपल्या सौंदर्याच्या बाबतीत फारच सजग असतात. कुणाला जास्त उंची हवी असते. तर कुणाला कमी उंची क्युट वाटते. परंतु बऱ्याचवेळा असे दिसून येते की, कमी उंची असणाऱ्या मुलीच आपल्या उंचीबाबत जास्त नाखूष असतात. ज्या मुलींची उंची कमी असते त्या अनेकदा त्यांच्या लूकबद्दल खूप सतर्क असतात. कमी उंची असूनही उंच कसे दिसता येईल, याकडे त्यांचा कल असतो. काही मुली आपली उंची वाढवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात, पण त्यांना त्याचा फारसा फायदा होत नाही. परंतु आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमची उंची कमी असली तरी याचा अर्थ असा नाही की, तुम्ही उंच असल्याचा भ्रम निर्माण करू शकत नाही. योग्य फॅशन सेन्सने तुम्ही विविध गोष्टी बदलू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फॅशन हॅक्सबद्दल सांगत आहोत, ज्या कमी उंचीच्या मुलींसाठी खूप उपयुक्त ठरतील. जर तुमची उंचीही कमी असेल तर तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करा.

मोनोक्रोमॅटिक आऊटफिट्स खरेदी करा-

जर तुमची उंची कमी असेल तर तुमच्या वॉर्डरोबमध्ये मोनोक्रोमॅटिक पोशाखांना जास्तीत जास्त जागा द्या. अर्थातच एकसारख्या रंगाचे कपडे खरेदी करा., ज्यामध्ये टॉप आणि सलवार एकाच रंगाची असेल. जर तुम्ही प्लेन आउटफिट परिधान करत असाल तर त्यात फक्त एकाच रंगाला प्राधान्य द्या. या हॅकचा अवलंब करण्याचा फायदा असा आहे की, असे कपडे एक भ्रम निर्माण करतात आणि तुम्ही उंच दिसू लागता. त्यामुळे आजच मोनोक्रोमॅटिक आउटफिट्सला तुमच्या लाईफस्टाईलचा भाग बनवा.

व्हर्टिकल लाईन्सचे कपडे (उभ्या रेषा असणारे)-

उंची कमी असूनही उंच दिसण्यासाठी ही देखील एक उत्तम आणि सोपी फॅशन हॅक आहे. ज्यामुळे तुम्ही उंच दिसता. जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही चुकूनही आडवे पट्टे असणारे कपडे घालू नयेत. त्याऐवजी तुम्ही तुमच्या स्टाइलमध्ये उभ्या पट्ट्या असणाऱ्या कपड्यांना प्राधान्य द्यावे. अशा पट्ट्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्हाला सडपातळ आणि उंच दिसण्यास मदत करतात. त्यामुळे जर तुम्ही उभ्या पट्ट्या घातल्या तर उंच असल्याचा भ्रम तर निर्माण होईलच, पण तुम्ही थोडे सडपातळसुद्धा दिसाल.

शॉर्ट कुर्तीचा वापर-

बाजारात मुलींसाठी अनेक प्रकारचे फॅशन पर्याय उपलब्ध असले, तरी तुम्हाला कोणताही पोशाख अतिशय हुशारीने निवडायचा आहे. जेणेकरून तुम्ही तुमची कमी उंची लपवून उंच दिसू शकता. अर्थातच जर तुमची उंची कमी असेल, तर तुम्ही लाँग टॉप घालण्याऐवजी क्रॉप टॉप घालावा. यासोबत तुम्ही स्कर्ट कॅरी करू शकता. लांब उंचीचा भ्रम निर्माण करण्यासाठी, क्रॉप टॉपसह लांब कोट घालण्यास विसरू नका. हा एक अतिशय स्टाइलिश पर्याय आहे, जो कमी उंचीच्या मुलींसाठी अगदी योग्य आहे.

 

विभाग