which glasses to choose for which face: सध्याचे युग हे फॅशनचे युग आहे. आणि प्रत्येकाला त्याच्याशी जुळवून घ्यायचे आहे. मुले असो की मुली, प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटतं. लोकांनी त्यांच्या ड्रेसिंग सेन्सचं कौतुक करावं. त्यांना त्यांच्या चमकदार त्वचेचं रहस्य विचारावं आणि एकूणच त्यांच्या लुकबाबत त्यांचं कौतुक करावं असं सर्वांनाच वाटत असतं. लोक स्टायलिश आणि सुंदर दिसण्यासाठी खूप काही करतात. जसे की, केस दाट आणि काळे करण्यासाठी ते महागड्या आणि चांगल्या ब्रँडचे शॅम्पू वापरतात.
चेहऱ्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधने वापरतात आणि चांगले कपडे घालतात. पण जेव्हा चष्मा घ्यायची वेळ येते. तेव्हा लोक कोणताही विचार न करता सहजपणे चष्मा खरेदी करतात. पण हे चूक आहे. कारण तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार त्याला साजेसा चष्मा घेतल्यास तुमचा लूक अतिशय खुलून दिसेल. पण चष्म्याची निवड योग्यरीत्या न केल्यास तुमचा लुक खराब होऊ शकतो. त्यामुळेच चष्मा कशाप्रकारे खरेदी करायचा ते जाणून घेऊया.
गोल आकार असलेल्या लोकांनी कोनीय अरुंद चष्मा निवडला पाहिजे. यामुळे तुमचा चेहरा लांब आणि सडपातळ दिसण्यास मदत होईल.
या आकाराच्या लोकांनी गोल किंवा अंडाकृती आकाराचा चष्मा घालावा. कारण ते शेप त्यांच्यावर चांगले दिसतात. चौरस आकार असलेल्या लोकांनी अशा फ्रेमची निवड करावी ज्याची रुंदी खोलीपेक्षा जास्त असेल.
जास्त रुंदीच्या फ्रेमचे चष्मे अंडाकृती आकाराच्या चेहऱ्यावर चांगले दिसतात. आणि हे चष्मे त्यांचा लूक अधिक खुलवतात.
डायमंड शेप असलेल्या लोकांनी ओव्हल आकाराच्या फ्रेम्स किंवा अगदी आय फ्रेम्स निवडल्या पाहिजेत. असे केल्याने तुमचे डोळे आणि गालाचा आकार सुंदर दिसेल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, डायमंड शेप असलेले लोक खूप कमी असतात.
आयताकृती, अंडाकृती किंवा गोल आकाराचे फ्रेमचे चष्मे या आकाराच्या लोकांना शोभतात. फक्त तुमच्या चष्म्याची फ्रेम वरच्या भागापेक्षा तळाशी रुंद असल्याची खात्री करून घ्या. चष्मा निवडताना या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा.