मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fashion Essentials: वॉर्डरोबमध्ये नक्की ठेवा हे ५ प्रकारचे दुपट्टे, साध्या कुर्त्याला बनवतील सुंदर

Fashion Essentials: वॉर्डरोबमध्ये नक्की ठेवा हे ५ प्रकारचे दुपट्टे, साध्या कुर्त्याला बनवतील सुंदर

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 27, 2024 07:54 PM IST

Dupatta Fashion: मुलींनी त्यांच्या वॉर्डरोबमध्ये हे ५ प्रकारचे दुपट्टे ठेवले पाहिजे. याने त्या कोणत्याही प्रसंगी एथनिक आणि ग्रेसफुल लुक मिळवू शकता.

दुपट्टा फॅशन
दुपट्टा फॅशन

Different Types of Dupatta: प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये कुर्त्याचे काही सेट नक्कीच असतात. हे साधे कुर्ते केवळ कॅज्युअल वेअर म्हणून नव्हे तर पार्ट्यांमध्ये सुद्धा घालून तुम्ही सुंदर दिसू शकता. फक्त हे ५ प्रकारचे दुपट्टे सोबत ठेवा. जे तुम्ही कुर्त्यासोबत खांद्यावर टाकून पार्टीसाठी तयार होऊ शकता. किंवा तुम्हाला कोणत्याही प्रसंगी सुंदर लुक मिळू शकतो. कोणत्या प्रकारचे दुपट्टे असले पाहिजे ते जाणून घ्या.

शिफॉन दुपट्टा

साधा शिफॉन दुपट्टा तुमच्या वॉर्डरोबमध्ये ठेवा. एथनिक आणि एलिगंट लुक मिळवण्यासाठी तुम्ही ते कोणत्याही कुर्त्या सोबत मॅच करू शकता. वजन कमी असल्याने ते कॅरी करणे सोपे आहे. लाइट शेडचे दुपट्टे रोजच्या वापरासाठी चांगले आहेत. ब्राइट कलरचा कॉन्ट्रास्ट दुपट्टा कुर्त्यासोबत पेअर करून तुम्ही यूनिक लुक मिळवू शकता.

सिल्कचा दुपट्टा

बनारसी, चंदेरी किंवा कोणत्याही सिल्क फॅब्रिकपासून बनवलेला दुपट्टा तुमच्या वॉर्डरोबमध्ये ठेवा. जे तुम्ही वेडिंग-पार्टी लुक मिळवण्यासाठी कोणत्याही कुर्त्यासोबत मॅच करू शकता. या प्रकारचे दुपट्टे एथनिक वेअरसाठी परफेक्ट लुक देतात.

एम्ब्रॉयडरी दुपट्टा

आजकाल मल्टीकलर एम्ब्रॉयडरी दुपट्टे बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. या प्रकारचा दुपट्टा तुम्ही कोणत्याही रंगाच्या कुर्त्या सोबत सहज मॅच करू शकता. ते गर्दीत हटके लुक देतात आणि सुंदर दिसतात.

हँड पेंटेड दुपट्टे

हँड पेंटेड डिझाइनचे दुपट्टे अगदी यूनिक दिसतात. ते दिसायला आकर्षक आहेत आणि सुंदर लुक मिळवण्यासाठी तुम्ही त्यांना कोणत्याही प्रसंगी परिधान करू शकता. कलमकारी किंवा बांधणी प्रिंटचे दुपट्टेही छान दिसतात.

मल्टीयूज दुपट्टा

हलका आणि लहान आकाराचा दुपट्टा स्टोलसारखा कॅरी करता येतो. जीन्स किंवा कपड्यांवर तुम्ही ते सुंदरपणे परिधान करू शकता आणि स्टायलिश लुक मिळवू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel