Farah Khan food show: फराह खान घेऊन येतेय चमचमीत पदार्थांची मेजवानी; ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ शोचा आजपासून OTTवर धमाका
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Farah Khan food show: फराह खान घेऊन येतेय चमचमीत पदार्थांची मेजवानी; ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ शोचा आजपासून OTTवर धमाका

Farah Khan food show: फराह खान घेऊन येतेय चमचमीत पदार्थांची मेजवानी; ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ शोचा आजपासून OTTवर धमाका

Jan 27, 2025 09:25 PM IST

Celebrity Masterchef India - कोरिओग्राफर फराह खान हिचा ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’ शो आजपासून सुरू होत आहे. विकास खन्ना, रणवीर बरार, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना यासारखे भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ या शोमध्ये विविध, चमचमीत खाद्यपदार्थ बनवण्याची टेक्निक शिकवतील.

फराह खानचा ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’शोचा आजपासून धमाका
फराह खानचा ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’शोचा आजपासून धमाका

बॉलिवूडची प्रसिद्ध डायरेक्टर आणि कोरिओग्राफर फराह खान ही फूडी म्हणून ओळखली जाते. घरी विविध खाद्यपदार्थ बनवण्याची आणि मित्रांना खाऊ घालण्याची तिला आवड आहे. याविषयीचे अनेक व्हिडिओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता फराह खान विविध पंचपक्वान शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे बनवावे याचे धडे देणार आहे. यावेळी ती एकटी नाहीए, तर भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ तिच्यासोबत परीक्षक म्हणून असणार आहे. विकास खन्ना, रणवीर बरार, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना यासारखे भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ यांच्यासोबत ती खाद्यपदार्थांची सफर घडवून आणणार आहे. फराह खानचा पाककलेचा हा नवा शो आज रात्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सेलिब्रिटी मास्टरशेफ ऑनलाइन कुठे पहावे

'सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया'चे (Celebrity Masterchef India) सोमवार, २७ जानेवारीपासून रात्री ८ वाजल्यापासून सोनी टीव्ही आणि सोनी लिव्हवर स्ट्रीमिंग सुरू होणार आहे. हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता पाहता येणार आहे.

सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया शोमध्ये १० हून अधिक टीव्ही कलाकार सहभागी होणार आहेत. सेलिब्रिटी मास्टरशेफच्या इन्स्टाग्राम पोस्टनुसार स्पर्धकांच्या यादीत गौरव खन्ना, तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कर, राजीव अदतिया, निक्की तांबोळी, अर्चना गौतम, फैजल शेख (मिस्टर फैसू), उषा नाडकर्णी, कविता सिंग, चंदन प्रभाकर आणि अभिजीत सावंत यांचा समावेश आहे.

सेलिब्रिटी मास्टरशेफच्या प्रोमो क्लिप्सने प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रिटी विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी स्पर्धा करताना पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत.

सेलिब्रिटी मास्टरशेफ कार्यक्रमात दिग्दर्शिका, कोरिओग्राफर फराह खान ही होस्ट म्हणून दिसणार असून शेफ विकास खन्ना आणि शेफ रणवीर बरार हे तिच्याबरोबर परीक्षक असतील. दरम्यान, फराह खान ही देखील हा शो होस्ट करण्याबाबत प्रचंड उत्सूक दिसून येत आहे.

Whats_app_banner