Pregnancy Planning : बाळाचं प्लॅनिंग करताय? गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pregnancy Planning : बाळाचं प्लॅनिंग करताय? गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी!

Pregnancy Planning : बाळाचं प्लॅनिंग करताय? गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी!

Published Feb 11, 2025 05:03 PM IST

Family Planning Health Tips : निरोगी पालक निरोगी बाळाला जन्म देऊ शकतात. यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करणे गरजेचे आहे.

बाळाचं प्लॅनिंग करताय? गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी!
बाळाचं प्लॅनिंग करताय? गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी!

Family Planning Tips : गर्भधारणेची तयारी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोडप्यांचे आरोग्य. निरोगी पालक निरोगी बाळाला जन्म देऊ शकतात. यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करणे गरजेचे आहे. यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी जोडप्याने दैनंदिन जीवनात निरोगी आहार-विहाराच्या सवयींचा अवलंब केला पाहिजे. पुरक आहार आणि जीवनशैलीतील बदल हे पुरुष आणि महिलांमधील प्रजननक्षमता सुधारण्यास मदत करतात, असे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. रितू हिंदुजा सांगतात.

पुरक आहाराचे सेवन :

१. संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा-

* हार्मोनल संतुलन आणि प्रजनन आरोग्य चांगले रहावे यासांची तुमच्या आहारात आवश्यक बदल करा.

* ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

* क्विनोआ, ब्राऊन राईस, ओट्स यांचा आहारात समावेश करा.

* मसूर, शेंगा आणि प्रथिनांचा आहारात समावेश करा (उदा.मासे, चिकन, टोफू)

* लोह, जस्त, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फॉलिक अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

* हे पोषक घटक स्त्रीबीज आणि शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

 

२. कॅफिनचे सेवन मर्यादित करा-

* कॅफिनचे अधिक सेवन हे प्रजनन क्षमता कमी करते.

* कॅफिनयुक्त पेयांचे सेवन मर्यादित करा(दिवासातून अंदाजे एक छोटा कप कॉफी). हळूहळू प्रमाण कमी करत आठवड्यातून एकदा कॅफिनयुक्त पेयांचे सेवन करण्याचा प्रयत्न करा.

* कॅफिनच्या सेवनाबद्दल वैयक्तिक सल्ल्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

३. वजन नियंत्रित राखा

* जास्त वजन किंवा कमी वजन हार्मोन्सच्या पातळीत व्यत्यय आणू शकते आणि प्रजनन क्षमता कमी करू शकते.

* जास्त वजन महिलांमधील ओव्हुलेशन प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणू शकते आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता कमी करू शकते.

* कमी वजनाच्या व्यक्तींमध्ये मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि स्त्रीबीज उत्पादन कमी होऊ शकते.

* चालणे, योगा करणे किंवा पोहणे यासारखे व्यायाम पर्याय निवडा.

* तुमच्या शरीराला पुरत उष्मांकाच्या गरजांनुसार संतुलित आहार घ्या.

Thyroid Health Tips: थायरॉईडमध्ये वजन का वाढते? कशा प्रकारे ठेवू शकतात नियंत्रणात? जाणून घ्या

४. धूम्रपान आणि मद्यपान टाळा-

* ते स्रीबीजाची गुणवत्ता कमी करू शकते आणि हार्मोन्सवर परिणाम करते.

* पुरुषांमध्ये या सवयी शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता कमी करतात.

* गर्भधारणेचा प्रयत्न करण्यापूर्वी धूम्रपान आणि मद्यपान सोडल्याने प्रजनन क्षमता सुधारते.

५. प्रक्रिया केलेले आणि शर्करायुक्त पदार्थ टाळा-

* प्रक्रिया केलेले आणि साखरयुक्त पदार्थ हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकतात, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

* पॅकेज्ड फुड, सोडा आणि जंक फूडचे सेवन टाळा. शक्य असेल तेव्हा ताजे, घरी शिजवलेले जेवण घ्या.

 

६. तणावाचे व्यवस्थापन करा-

* दीर्घकालीन तणाव हार्मोन्सच्या पातळीत व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.

* योग, ध्यान किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम करा. छंद जोपासा. तणाव व्यवस्थापित करण्यासाठी समुपदेशन किंवा थेरपीचा पर्याय निवडा.

गर्भधारणेपुर्वी संतुलित आहाराचे सेवन करणे, निरोगी वजन राखणे आणि धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या हानिकारक सवयी टाळणे निरोगी गर्भधारणेस नक्कीच मदत करेल. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात, म्हणून योग्य मार्गदर्शनासाठी प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner