Face Yoga Benefits: सध्याच्या काळात फिटनेस सांभाळण्यासाठी लोक आवर्जून योगाभ्यास करत आहेत. लोक दररोज विविध योग करून स्वतःचे आरोग्य जपत आहेत. योगाचे अनेक प्रकार आहेत. ज्यामध्ये फेस योगा किंवा फेशियल योगा हा अतिशय लोकप्रिय योग आहे. हा एक असा योगप्रकार आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या आणि मानेच्या स्नायूंचा व्यायाम करता. या व्यायामाचे उल्लेखनीय फायदे आहेत. चेहऱ्यावरील अनेक स्नायू सतत काम करतात. म्हणून, चेहऱ्याचा योग आवश्यक आहे. जेणेकरून चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स राहतील आणि त्याचे फायदे तुम्हाला मिळवू शकतील.
प्रत्येक व्यक्तीला सुंदर आणि आकर्षक दिसण्याची इच्छा असते. त्यामुळेच सुंदर दिसण्यासाठी, ते त्यांच्या दैनंदिन जगण्यामध्ये महागडे सौंदर्य उपचार, विविध केमिकलयुक्त क्रीम, घरगुती उपचार इत्यादींचा समावेश करतात. परंतु बहुतांश लोकांना अद्याप फेस योगाचे महत्व माहिती नाही, फेस योगा हे एक प्रभावी माध्यम आहे. ज्याद्वारे लोक सुंदर आणि आकर्षक दिसू शकतात. परंतु फेस योगा करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. आज आपण फेस योगाबाबत महत्वाच्या गोष्टी आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
-फेस योगा नियमित केल्याने चेहऱ्याचा रक्तप्रवाह सुधारतो. शिवाय चेहऱ्यावरील थकवा दूर करून चमक आणणे हा फेशियल योगाचा खरा उद्देश आहे.
-तज्ज्ञांच्या मते, फेशियल योगा जेव्हा चेहऱ्यावरील रक्त प्रवाह वाढवते, तेव्हा ते रक्ताभिसरण कोलेजनचे उत्पादनदेखील वाढवते. कोलेजन त्वचेला घट्ट ठेवण्यास मदत करते. जेणेकरून त्वचा ओघळत नाही. तसेच चेहऱ्यावरील वयानुसार दिसणाऱ्या बारीक रेषा आणि सुरकुत्या प्रतिबंधित करते. ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंद होते.
-फेस योगामुळे अनावश्यक ताण कमी होतो. म्हणजेच तणावामुळे चेहऱ्यावरील अकाली तणावाच्या रेषा दूर होतात. आणि चेहऱ्यावरचा थकवाही दूर होतो.
-महत्वाचं म्हणजे फेस योगा हे चेहऱ्याच्या स्नायूंना बळकट आणि टोन करते. ज्यामुळे त्वचा सैल पडण्याची किंवा ओघळण्याची प्रक्रिया मंदावते. आणि तुम्ही तरूण दिसू लागता.
-फेस योगामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या चमक येण्यास मदत होते. त्यामुळेच कृत्रिम पद्धती वापरण्याची गरज पडत नाही. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. क्रिम, पावडर, ब्लीच आणि मेकअप चेहऱ्याच्या त्वचेचा नाश करतात. अशा परिस्थितीत, त्वचेवर चमक आणण्यासाठी फेस योग हा एक अतिशय सोयीस्कर आणि नैसर्गिक मार्ग आहे.