Face Massage With Almond Oil: त्वचा स्वच्छ आणि सुंदर असावी असं प्रत्येकालच वाटत. यासाठी योग्य आहार आणि तर स्किन केअर रुटीनची काळजी घेणे गरजेचे आहे. जर चमकदार त्वचा हवी असेल तर त्वचेची निगा राखण्याची काही गोष्टी फॉलो करणे गरजेचे आहे. सर्वात आधी त्वचेची स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. या शिवाय मसाज करणे देखील महत्त्वाचे आहे. फेस मसाजमुळे त्वचेला एक वेगळीच चमक येते. चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचेची छिद्रे उघडतात आणि रक्ताभिसरण सुधारते. विशेषत: हिवाळ्यात फेस मसाज केल्याने त्वचा चमकदार होते. बदामाच्या तेलाने चेहऱ्याला मसाज केला तर ते तुमच्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे. हिवाळ्यात बदामाचे तेल त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेऊयात.
> हिवाळ्यात त्वचा कोरडी होते पण दररोज बदामाच्या तेलाने मसाज केल्याने त्वचा मुलायम आणि गुळगुळीत होईल. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते ज्यामुळे त्वचा मुलायम होते. फेस मसाजमुळे त्वचेला लवचिकता येते आणि त्वचा गुळगुळीत दिसते.
> पिंपल्सचा त्रास असणाऱ्यांनी बदामाच्या तेलाने मसाज करावा. बदामाच्या तेलामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे बॅक्टेरिया कमी करतात.
> ज्या लोकांना डार्क सर्कल आहेत त्यांनी बदामाच्या तेलाने मालिश करावी. बदामाच्या तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात ज्यामुळे डोळ्यांखालील सूज कमी होते. बोटांनी हलक्या हाताने डोळ्यांना मसाज करा.
> जसजसे वय वाढते तसतसे त्वचेवर बारीक रेषा दिसू लागतात. या सुरकुत्या अजिबात छान वाटत नाही. अशावेळी बदाम तेलाने मसाज करा. बदामाच्या तेलाने मसाज केल्याने सुरकुत्या कमी होतात.
> मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि त्वचेची लवचिकता टिकून राहते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)