How to remove unwanted facial hair: चेहऱ्यावर नको असलेले केस हाताळण्यासाठी महिला अनेकदा पार्लरकडे वळतात. पण या समस्येचा सौंदर्याशी काहीही संबंध नाही. जर तुमच्या चेहऱ्यावर हनुवटीसह, नाभी आणि छातीच्या आसपास केस दिसत असतील तर ते उच्च DHT पातळीमुळे आहे. DHT म्हणजेच डाय हाइड्रोटेस्टो स्टेरॉन हा एक संप्रेरक आहे. महिलांच्या शरीरात जसजसे ते वाढते तसतसे पुरुषांप्रमाणे महिलांच्या शरीरावर केस येऊ लागतात. चेहरा, छाती आणि पोटावर केस दिसतात. या समस्येला हर्सुटिझम म्हणतात. या समस्येचा सामना करण्यासाठी आहारतज्ञ सोशल मीडियावर जीवनशैलीत बदल घडवून आणण्यासाठी ८ बदलांविषयी सांगत आहेत.
DHT पातळी कमी करण्यासाठी मेथीच्या पाण्याने दिवसाची सुरुवात करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण असे केल्याने चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांची वाढ कमी होते.
दिवसातून किमान दोनदा स्पेअरमिंट चहा प्या. हा चहा फ्री टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करतो. जे स्त्रियांमध्ये PCOS आणि हर्सुटिझम या दोन्हीपासून आराम देते.
चेहऱ्याच्या ज्या भागात नको असलेले केस वाढत आहेत, त्या भागांवर पुदिन्याचे तेल लावा. हे तेल एंड्रोजनची पातळी कमी करेल आणि चेहऱ्यावरील केसांची वाढ देखील थांबवेल.
तज्ज्ञांच्या मते, चेहऱ्यावरील केस टाळण्यासाठी मॅग्नेशियम जास्त असलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. बदाम आणि पालेभाज्या खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉनची वाढ नियंत्रित होते. त्यामुळे चेहऱ्यावरील नकोशा वाटणाऱ्या केसांपासून सुटका होते.
दुपारच्या जेवणानंतर दालचिनीचे पाणी प्या. हे पाणी प्यायल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते आणि एंड्रोजनची पातळीही कमी होते. त्यामुळे केस येणे कमी होतात.
भोपळ्याच्या बिया, पांढरे हरभरे यांसारखे झिंकयुक्त पदार्थ खा. झिंक टेस्टोस्टेरॉन हार्मोनला डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉनमध्ये रूपांतरित करणाऱ्या एन्झाइमला प्रतिबंधित करते. जे चेहऱ्यावरील केसांची समस्या कमी करण्यास मदत करते.
मूग डाळ चीला, हरभरा कोशिंबीर हे प्रथिनेयुक्त पदार्थ आहेत. आपल्या आहारात प्रथिनांचा समावेश करण्याची खात्री करा. हे इन्सुलिनची संवेदनशीलता रोखेल आणि चेहऱ्यावरील केसांची वाढ कमी करेल.
दररोज संध्याकाळी चेस्टबेरी चहा प्या. हा चहा पीरियड्स सायकल नियमित करण्यात मदत करतो जी डीएचटी पातळीमुळे विस्कळीत होत आहे. हे एंड्रोजन पातळी देखील राखते. शिवाय शरीरावर नको असलेले केस येणे बंद होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. याबाबतीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)