optical illusion: अलीकडच्या काळात लॅपटॉप, स्मार्टफोन, टीव्ही, टॅब आणि इतर अनेक उपकरणांवर स्क्रीनसमोर तासनतास वेळ घालवणे सामान्य झाले आहे. कोणी ऑफिसचे काम पूर्ण करत असते. तर कोणी गेम खेळत असते. याशिवाय व्हिडीओ स्क्रोल करणे ही देखील एक सवय झाली आहे. गॅझेट हातात असले तरी स्क्रीन टाईमचा सर्वाधिक फटका डोळ्यांना सहन करावा लागतो. तथापि, तुमचे डोळे अजूनही तीक्ष्ण आहेत की नाही? शोधण्यासाठी, एक लहान चाचणी आज आपण घेणार आहे. हे एक ऑप्टिकल इल्युजन आहे. या फोटोच्या सहाय्याने तुमचे डोळे कितपत निरोगी आहेत हे जाणून घेऊ शकता.
वर दिसणाऱ्या लाल वर्तुळाच्या चित्रात, जेव्हा तुम्ही ते पहिल्यांदा पाहता, तेव्हा तुम्हाला फक्त एक सामान्य गोलाकार प्रतिमा दिसत आहे. गोष्ट फक्त एवढीच नाही. त्या गोलातही एक नंबर लपलेला आहे. या लाल वर्तुळाकडे पाहण्यासाठी आणि आत लपलेली आकृती शोधण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचे डोळे तीक्ष्ण करायचे आहेत.
हे काम वाटते तितके सोपे नाही. त्याची अट अशी आहे की, नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त ७ सेकंद आहेत. जर तुम्ही या चाचणीत उत्तीर्ण झाला असाल तर तुम्हाला शुभेच्छा, पण जर तुम्ही उत्तीर्ण झाला नसाल तर तुमच्या डोळ्यांची काळजी घेणे सुरू करा. डेली क्विझ आणि रिडल्स नावाच्या X खात्यावर हे चित्र शेअर केले गेले आहे. या चित्रातील लाल रंगात ३८ हा आकडा लपला आहे.
हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी हे आव्हान स्वीकारून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काही वापरकर्त्यांनी असे उत्तर दिले की, 38 क्रमांक दृश्यमान आहे. तर काहींचे उत्तर ८८ असे होते. इतकेच नाही तर एका यूजरने त्यात ७३१ पाहिले. तर, एका युजरने त्यात बीबी लिहिले आहे असे म्हटले आहे. ३८ सोडून ज्यांना वेगळा आकडा दिसलाय त्यांनी निरोगी डोळ्यांसाठी एकदा आपले डोळे तपासून घेण्याची गरज आहे.
संबंधित बातम्या