Eye Care Tips: आठवड्याभरात कमी होतील डोळ्यांखालची काळी वर्तुळे! हे घरगुती उपाय आहेत बेस्ट
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eye Care Tips: आठवड्याभरात कमी होतील डोळ्यांखालची काळी वर्तुळे! हे घरगुती उपाय आहेत बेस्ट

Eye Care Tips: आठवड्याभरात कमी होतील डोळ्यांखालची काळी वर्तुळे! हे घरगुती उपाय आहेत बेस्ट

Published Aug 01, 2024 12:25 PM IST

Home Remedies to Remove Dark Circles: वाढलेल्या ताणतणावामुळे नैराश्य येते. अशातच डोळ्यांभोवती आणि डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी तरुणाईतसुद्धा डोळ्यांखाली काळी वर्तुळे अर्थातच डार्क सर्कलची समस्या दिसून येते.

डोळ्यांखालची काळी वर्तुळे आणि घरगुती उपाय
डोळ्यांखालची काळी वर्तुळे आणि घरगुती उपाय

Home Remedies to Remove Dark Circles: आधुनिक जगात लोकांच्या लाइफस्टाईलमध्ये वेगाने बदलत होत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या शैक्षणिक, करिअर आणि एकंदरीत लाइफसंबंधित अपेक्षा वाढत आहेत. एकमेकांशी असलेली स्पर्धा, चढउतार यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात काही ना काही बदल घडत असतात. अनेकांना अपेक्षा पूर्ण न झाल्याने, किंवा वाढलेल्या ताणतणावामुळे नैराश्य येते. अशातच डोळ्यांभोवती आणि डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी तरुणाईतसुद्धा डोळ्यांखाली काळी वर्तुळे अर्थातच डार्क सर्कलची समस्या दिसून येते. बहुतांश लोक डॉक्टरांकडे धाव घेतात, काही लोक स्वतः सोशल मीडियावर पाहून विविध सौंदर्य प्रसाधने वापरतात तर काही लोक घरगुती उपाय करण्यावर विश्वास ठेवतात. आज आम्ही तुम्हाला डार्क सर्कलसाठी असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे डोळे तर निरोगी होतीलच शिवाय डोळ्यांना ताणतणावापासून आरामही मिळेल.

घरगुती उपाय अधिक सुरक्षित

अलीकडच्या काळात आपल्या स्किन केअरसाठी प्रत्येक व्यक्ती सजग झाली आहे. दरम्यान आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु या केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांचे अनेक दुष्परिणामदेखील आहेत. अशात जर त्यात जास्त केमिकल्स असतील तर संवेदनशील त्वचेला जास्तच हानी पोहोचते. विशेष म्हणजे बहुतांश स्त्रिया आपल्या त्वचेच्या प्रकाराकडे लक्ष न देता त्वचेवर कोणतेही उत्पादन वापरतात. त्यामुळे ते प्रॉडक्ट्स त्यांच्या चेहऱ्यावर सूट होत नाहीत आणि त्यांच्या त्वचेची हानि होते. अशात त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय जास्त चांगले आणि सुरक्षित असतात. त्यामुळेच आज आपण डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांसाठी घरगुती उपाय पाहणार आहोत. डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे पूर्णपणे लगेच घालवणे कोणालाही शक्य नसते. मात्र आज आपण पाहणार असलेल्या घरगुती उपायांनी तुमचे डार्क सर्कल मोठ्या प्रमाणात कमी होतील. आणि हळूहळू दूरसुद्धा होतील.

काकडीचा रस

आपल्या घरातील फळभाज्यांमध्ये काकडीचा आवर्जून समावेश असतो. काकडी फक्त तुमच्या तोंडाची चव वाढवत नाही. तर त्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. काकडी वजन कमी करण्यापासून, डोळ्यांखालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी लाभदायक आहे. त्वचेला आवश्यक असणारा ओलावा तुमच्या त्वचेत नसल्यानेसुद्धा डोळ्यांखालची त्वचा काळी पडते. तुम्ही काकडीच्या रसाने डार्क सर्कल अर्थातच डोळ्यांखालचा काळेपणा कमी करू शकता. काकडीचा रस एका भांड्यात घेऊन कापसाच्या मदतीने त्वचेवर लावा. शिवाय डोळ्यांवर काकडीचे काप ठेवूनही काहीच दिवसांत फरक दिसून येतो.

मध आणि काकडी

भारतीय स्वयंपाक घरात मध आवर्जून पाहायला मिळते. अनेक पदार्थांमध्ये मधाचा वापर केला जातो. शिवाय सौंदर्य प्रसाधन म्हणूनही मधाचा वापर करील जातो. मधाचे मानवी शरीराला अनेक फायदे मिळतात. तुमच्या डोळ्यांभोवती काळवंडलेल्या त्वचेवर तुम्ही मध लावून त्यावर काकडीचे काप ठेवल्यास उपयुक्त ठरते. याच्या नियमित वापराने तुमचे डोळे निरोगी होतात. शिवाय डोळ्यांभोवती असलेली काळी वर्तुळे दूर होतात.

बटाट्याचा रस

बटाटा हा एक खाण्याचा पदार्थ असला तरी त्याचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठीदेखील केला जातो. बटाट्याच्या रसामुळे टॅनिंग, पिगमेंटेशन आणि काळी वर्तुळे बऱ्याच प्रमाणात कमी होतात. बटाट्यात मोठ्या प्रमाणात स्टार्च असते. त्यामुळेच नियमित या रसाचा वापर केल्यास तुमच्या त्वचेवर सकारात्मक बदल दिसून येतात. डोळ्यांखालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी एका वाटीत बटाट्याचा रस काढून कापसाच्या मदतीने तुमच्या डार्क सर्कलवर हळुवार लावा. नियमित असे केल्याने काहीच दिवसांत तुम्हाला फरक दिसून येईल.

 

Whats_app_banner