20-20-20 Rule for Tired Eyes: डोळे हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. खरं तर आपण याची अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे. पण अनेकदा डोळ्यांच्या काळजीकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा स्क्रीनसमोर तासन्तास बसल्यामुळे डोळ्यांत वेदना किंवा जळजळ होण्याची समस्या उद्भवते. तुमच्यासोबतही असे घडत असेल तर तुम्हाला डोळ्यांवर ताण येऊ शकतो. हा ताण २०-२०-२० नियमाने दुरुस्त केला जाऊ शकतो. या नियमानुसार स्क्रीन टाइमच्या प्रत्येक २० मिनिटांसाठी आपण किमान २० सेकंदांपर्यंत २० फूट दूर असलेल्या वस्तूकडे पहावे. स्क्रीन टाइममधून असे नियमित ब्रेक घेतल्याने तुमच्या डोळ्यांना थोडासा आवश्यक आराम मिळू शकतो आणि डोळ्यांचा ताण टाळण्यास मदत होऊ शकते. डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी आणखी काय करता येते ते जाणून घ्या.
- डोके दुखणे
- प्रकाशाची संवेदनशीलता
- लक्ष केंद्रित करण्यात त्रास होणे
- डोळे उघडे ठेवण्यास त्रास होणे
- मान दुखणे
- डोळे मॉइश्चराइझ करण्यासाठी आणि फ्रेश करण्यासाठी वारंवार डोळे मिचकावा.
- याशिवाय दर १५-३० मिनिटांनी स्क्रीनसमोरून ब्रेक घ्या.
- तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप स्क्रीनचे ब्राइटनेस अॅडजस्ट करा.
- टेक्स्टचा साइड नीट करा.
- डोळ्यांमध्ये जळजळ किंवा थकवा जाणवत असल्यास डोळ्यांवर पाणी शिंपडावे.
- ही समस्या टाळण्यासाठी हायड्रेशनची काळजी घ्या आणि भरपूर पाणी प्या.
- डोळ्यांची जळजळ दूर करण्यासाठी काकडीचा वापर करा. यासाठी थंड काकडी किसून घ्या आणि नंतर डोळ्यांना चोळा.
- जळजळ दूर करण्यासाठी कॉटन पॅडवर गुलाब जल घाला आणि नंतर ते डोळ्यांना लावा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या