Eye Care Exercises: डोळ्यांचा थकवा आणि वेदना दूर करतील हे 5 व्यायाम, तासन् तास लॅपटॉपवर काम करणाऱ्यांनी बातमी अवश्य वाचा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eye Care Exercises: डोळ्यांचा थकवा आणि वेदना दूर करतील हे 5 व्यायाम, तासन् तास लॅपटॉपवर काम करणाऱ्यांनी बातमी अवश्य वाचा

Eye Care Exercises: डोळ्यांचा थकवा आणि वेदना दूर करतील हे 5 व्यायाम, तासन् तास लॅपटॉपवर काम करणाऱ्यांनी बातमी अवश्य वाचा

Published Jul 27, 2024 09:31 AM IST

Eye Care Tips: आरोग्य तज्ञांच्या मते, आपल्या दिनचर्येत काही योगा आणि व्यायामाचा समावेश केल्यास तुमच्या डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांवर मात करता येऊ शकते.

Exercises For Eye Pain And Stress
Exercises For Eye Pain And Stress (shutterstock)

डोळ्यांच्या वेदना आणि ताणतणावासाठी व्यायाम : डोळ्यांच्या वेदना आणि ताणतणावासाठी व्यायाम : सध्याच्या धावपळीच्या जगात ऑफिस आणि करिअरमधील वाढत्या स्पर्धेमुळे बहुतांश लोकांना तासनतास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसावे लागते. तासनतास स्क्रीनच्या समोर बसून सतत पडणाऱ्या प्रकाशामुळे कधीकधी डोळ्यांवर ताण येतो आणि डोकेदुखी होते. तज्ञांच्या मते, प्रत्येक तासाच्या वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंवर अतिरिक्त दबाव पडतो. त्यामुळेच लहान वयातच डोळ्यांना अस्पष्ट दिसणे , डोळ्यांना खाज येणे, पाणी येणे, डोकेदुखी अशा समस्यांनी लोक त्रस्त आहेत. बऱ्याच लोकांना अगदी कमी वयात चष्मा लागणे, आर्टिफिशियल लेन्स बसविणे असे पर्याय निवडावे लागत आहेत.

परंतु अनेकांना चष्मा किंवा लेन्सचा पर्याय मान्य नसतो. शिवाय बरेच उपचार घेऊन डोळ्यांचे आजार पूर्णपणे ठीक होत नाहीत. त्यामुळे लोक सतत चिंतेत असतात. शिवाय सततच्या त्याच-त्याच लाइफस्टाइलमुळे डोळ्यांचे आजार वाढतच जातात. मात्र आरोग्य तज्ञांच्या मते, आपल्या दिनचर्येत काही योगा आणि व्यायामाचा समावेश केल्यास तुमच्या डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांवर मात करता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया अशाच 5 सर्वोत्तम योगा आणि व्यायामांविषयी.

1) पामिंग

सतत लॅपटॉप, कम्प्युटरच्या स्क्रीनवर पाहून डोळे थकलेले असतात. त्यांना विश्रांतीची गरज असते. अशात पामिंग हा व्यायाम अत्यंत उपयोगी आहे. खासकरून हा डोळ्यांना आराम देणारा व्यायाम आहे. हा व्यायाम डोळ्यांचा थकवा दूर करण्यास मदत करतो. हा व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या हाताचे तळवे एकमेकांवर हळुवार चोळा आणि त्यांच्यात ऊब निर्माण करा. हातांची ऊब डोळ्यांमध्ये जाईपर्यंत हे उबदार तळवे आपल्या बंद डोळ्यांवर ठेवा.

२) चक्रासन

डोळे निरोगी ठेवण्यासाठी चक्रासन योगाचा नियमित सराव फायदेशीर ठरू शकतो. चक्रासनलाच धनुरासन असेही म्हटले जाते. चक्रासनामुळे डोळ्यांशी संबंधित अनेक समस्यांसह मेंदूही निरोगी राहण्यास मदत होते. चक्रासन योग करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपून गुडघे वाकवून टाच शक्य तितक्या आपल्या नितंबाच्या जवळ आणा. तळवे जमिनीवर ठेवा आणि पाय तसेच तळवे वापरून शरीर वरच्या दिशेने उचला. आपल्या खांद्याला समांतर असे पायात अंतर घ्या. शरीराचा संपूर्ण भार दोन्ही हातांवर आणि पायांवर समान ठेवा. आणि हळुवार शरीराला वरच्या बाजूला उचलून घ्या. या पोझमध्ये थोडा वेळ राहा.

3) पापण्या झपकणे –

डोळे निरोगी ठेवण्यासाठी कामाच्या दरम्यान पापण्या वेळोवेळी झपकत राहायला हव्यात. या योगाभ्यासामुळे ऑप्टिक मज्जातंतू मजबूत होण्यास आणि कोरड्या डोळ्यांची समस्या कमी होण्यास मदत होते. यासाठी शक्य तितक्या वेळेस सुमारे १० वेळा एकटक पापण्या झपकवावेत. त्यांनंतर डोळे बंद करून सुमारे 20 सेकंद दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा.

4) मकर मुद्रा-

मकर मुद्रा केल्याने डोळ्यांना आराम मिळतो. शिवाय डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळेसुद्धा दूर होतात. या योगामध्ये उजव्या हाताचा अंगठा डाव्या तळहातावर मध्यभागी आणि बाकीची बोटे डाव्या तळहाताच्या खाली अशा पद्धतीने तुमच्या हाताची रचना असेल. यानंतर डाव्या हाताचा अंगठा आणि अनामिक ही बोटे एकमेकांवर ठेवा. आता हाताची जी अवस्था असेल तिला मकर मुद्रा म्हणतात. अशा स्थितीत काही वेळ स्थिर बसून राहा.

5)२०-२०-२० चा नियम-

चांगल्या झोपेचे महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे. असे असूनही कामाच्या व्यस्ततेमुळे लोकांना पुरेशी झोप घेणे शक्य होत नाही. ज्यामुळे व्यक्तीमध्ये तणाव वाढू लागतो. २०-२०-२० या नियमाला अनुसरून चांगल्या झोपेच्या चक्रासह डोळ्यांचा व्यायाम केल्यास डोळ्यांचा ताण आणि थकवा दूर करण्यास मदत होते. या नियमानुसार दर २० मिनिटांनी कामातून विश्रांती घ्या. आणि सुमारे २० सेकंद आपल्यापासून वीस फूट अंतरावर असलेल्या वस्तूकडे पहा.

Whats_app_banner