Exercise for Fitness: शरीरात स्थिरता आणि ताकद हवी? रूटीनमध्ये समाविष्ट करा हे एक्सरसाइज
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Exercise for Fitness: शरीरात स्थिरता आणि ताकद हवी? रूटीनमध्ये समाविष्ट करा हे एक्सरसाइज

Exercise for Fitness: शरीरात स्थिरता आणि ताकद हवी? रूटीनमध्ये समाविष्ट करा हे एक्सरसाइज

Published Sep 13, 2023 12:24 AM IST

Increase Body Strength: हात आणि पाय बळकट करणे महत्वाचे आहे जेणेकरून ते वृद्धापकाळापर्यंत तुम्हाला साथ देऊ शकतील. हे करण्यासाठी काही व्यायाम तुमची मदत करतील. शरीराची ताकद वाढवण्यासाठी कोणते व्यायाम करावे ते जाणून घ्या.

शरीराची ताकद वाढवण्यासाठी व्यायाम
शरीराची ताकद वाढवण्यासाठी व्यायाम (unsplash)

Exercises For Body Strength: व्यायाम हा फक्त स्लिम राहण्यासाठी केला जात नाही तर तो शरीर तंदुरुस्त ठेवतो. जर तुमचे शरीर थोडेसे काम करून थकत असेल, हाडांमध्ये वेदना आणि शरीरात वेदना होत असेल तर शरीराला बळकट बनवणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात ऑस्टिओपोरोसिस आणि सांधेदुखीसारखे आजार टाळता येतील. या व्यायामांचा तुमच्या रूटीनमध्ये समावेश केल्याने तुमचे हात आणि पाय मजबूत होतात आणि शरीरातील वेदना आणि थकवा यापासून आराम मिळतो.

स्क्वॅट्स

संपूर्ण शरीराचे वजन पायांवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत पायांची ताकद खूप महत्त्वाची असते. जेणेकरून ते वृद्धापकाळापर्यंत सुरक्षित राहतील आणि त्यांना वेदना होणार नाहीत. स्क्वॅट्स व्यायामामुळे पायांची ताकद आणि मोबेलिटी वाढते. तसेच संतुलन आणि हाडांची घनता वाढते. त्यामुळे हाडे फ्रॅक्चर होणे यासारख्या समस्या होत नाहीत.

प्रेसअप्स

पुशअप्स किंवा प्रेसअप्समुळे संपूर्ण शरीराची ताकद वाढण्यास मदत होते. हे खांदे तसेच छाती आणि हात मजबूत करते. ज्याच्या मदतीने तुम्ही आणखी व्यायाम करू शकता. पुशअप्स अप्पर बॉडी पार्ट्सला मजबूत करण्यास मदत कराते.

प्लँक्स

जवळ जवळ प्रत्येक शरीराच्या प्रकारासाठी प्लँक्स करण्यासा सल्ला दिला जातो. प्लँक्स संपूर्ण शरीराचा समतोल राखण्यास मदत करतात आणि तळवे, खांदे आणि छातीला ताकद देतात.

 

लंग्स

हा व्यायाम करण्यासाठी प्रथम सरळ उभे रहा. आता एक पाय पुढे घ्या आणि गुडघ्याजवळ वाकवून ९० अंशांचा कोन तयार करा. मागचा पाय स्थिर ठेवून तो वाकवा. त्याचप्रमाणे दुसऱ्या पायाला वाकवून व्यायाम करा. हे व्यायाम रोज केल्याने पाय मजबूत होतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner