दिवसभरात दीड तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरल्यानं आरोग्यावर होतात गंभीर परिणाम!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  दिवसभरात दीड तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरल्यानं आरोग्यावर होतात गंभीर परिणाम!

दिवसभरात दीड तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरल्यानं आरोग्यावर होतात गंभीर परिणाम!

Dec 16, 2024 10:50 PM IST

Smartphone Side Effect: स्मार्टफोनचा अतिवापर केल्याने आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सर्वांना काळजी घेण्याची योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

दिवसभरात दीड तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरल्यानं आरोग्यावर होतात गंभीर परिणाम!
दिवसभरात दीड तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरल्यानं आरोग्यावर होतात गंभीर परिणाम!

Smartphone Disadvantages: मोबाईल फोन हा मानवी जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे. त्यामुळे अनेकदा लोक दिवसभर स्क्रोल करणे, ईमेल तपासणे, सोशल मीडिया अपडेट्ससह व्हिडिओ पाहताना दिसतात. असे अनेक लोक आहेत, जे एका वेळेज जेवणाचा डबा विसरतील. पण आपला फोन सोबत नेण्यास विसरणार नाही. तज्ज्ञांचे मते, फोनचा अतिवापर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. त्यामुळे शक्य तितका फोनचा वापर करणे टाळावे.

फोनच्या अतिवापरामुळे डोळ्यावर ताण येऊ शकतो. अगदी लहान वयातच डोकेदुखीसारखा त्रास होऊ शकतो. फोनच्या अतिवापराची लक्षणे म्हणजे मायग्रेन, डोकेदुखी, चक्कर येणे, डोळ्यांवर ताण येणे, मानदुखी आदीचा समावेश आहे. दीड तासांपेक्षा अधिक वेळ फोनमध्ये पाहणे अनेकदा घातक ठरू शकते. त्यामुळे फोनचा अतिवापर टाळला पाहजे.

फोनचा वापर करताना कोणती काळजी घेतली पाहिजे?

  • वारंवार फोनमध्ये बघणे टाळा: वारंवार फोनमध्ये पाहिल्यानंतर डोकेदुखीसारखा अनुभव येत असल्यास स्क्रीनपासून दूर जा आणि विश्रांती घ्या. आपले डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
  • हायड्रेट: डिहायड्रेशन डोकेदुखी वाढवू शकते, त्यामुळे आपण दिवसभर पुरेसे पाणी पित आहात याची खात्री करा. दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्यायले पाहिजे, याची काळजी घ्या.
  • योगासन करा: योगासन केल्याने स्नायूंचा ताण कमी होऊन डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. दिवसांत काही मिनिटे योगासन किंवा व्यायामासाठी द्या. मान आणि खांद्याचा व्यायाम नियमितपणे करा.
  • फिजिओथेरपिस्टशी संपर्क साधा: सतत डोकेदुखी होत असेल तर, काळजी घेण्याची गरज आहे. शक्य होईल, तितक्या लवकर फिजिओथेरपिस्टशी संपर्क साधा. फिजिओथेरपिस्टने सुचवलेला व्यायाम नक्की करा. त्यामुळे मान आणि खांद्याशी संबंधित उद्भवणारे आजार टाळता येऊ शकतात.
  • डोळ्यांची काळजी घ्या: डोळ्यांवर ताण येत असेल तर, डोके दुखी होणे त्रास सामान्य आहे. मोबाईल वापरताना चष्म्याच्या वापर करा. ज्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी करता येऊ शकतो. डोळ्यावरील ताण कमी करण्यासाठी वारंवार मोबाईलमध्ये पाहणे टाळावे.

तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना डोकेदुखीचा त्रास जास्त आहे. त्यांनी दुर्लक्ष न करता न्यूरोलॉजिस्टकडून तपासून घ्यावे. त्यामुळे आपल्याला पटकन आराम मिळू शकतो. अशा आजारांकडे दुर्लक्ष करणे अनेकांना महागात पडले आहे. त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.

Whats_app_banner