मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Exam Season Stress: मुलांना परीक्षेच्या दिवशी चुकूनही विचारू नका हे प्रश्न, एग्झाम स्ट्रेसपासून ठेवा दूर

Exam Season Stress: मुलांना परीक्षेच्या दिवशी चुकूनही विचारू नका हे प्रश्न, एग्झाम स्ट्रेसपासून ठेवा दूर

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 01, 2024 11:32 PM IST

Parenting Tips: जर तुम्हाला तुमच्या मुलाने परीक्षेत चांगले गुण मिळवावे असे वाटत असेल आणि परीक्षेत पेपर लिहिताना त्याला स्ट्रेस जाणवू नये असे वाटत असेल तर परीक्षेच्या दिवशी त्यांना काही गोष्टी अजिबात विचारू नका. पालकांनी काही सवयी बदलणे आवश्यक आहे.

परीक्षेच्या दिवशी पालकांनी मुलांना कोणते प्रश्न विचारू नये
परीक्षेच्या दिवशी पालकांनी मुलांना कोणते प्रश्न विचारू नये

Things Not To Tell to Child on Exam Day: बारावी नंतर आता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. लास्ट टाइम रिव्हिजन असो किंवा पेपरच्या आधी उरलेले डाउट्स क्लिअर करणे, विद्यार्थी सर्वतोपरी प्रयत्न करतात. जेणेकरून ते चांगले गुण मिळवू शकतील. तुमच्या मुलाने परीक्षेत चांगले गुण मिळवावेत आणि परीक्षेत पेपर लिहिताना त्याला कोणताही ताण जाणवू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर मूलांच्या आधी पालकांनी त्यांच्या काही सवयी बदलल्या पाहिजेत. खरं तर परीक्षेच्या काळात मुलांवर अभ्यासाबरोबरच चांगले गुण मिळवण्याचे दडपण असते. पालकही त्यांना या तणावातून मुक्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. पण हे करत असताना अनेक वेळा ते आपल्या मुलाला असे प्रश्न विचारतात, ज्यामुळे मुलांचे टेन्शन कमी होण्याऐवजी त्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. पॅरेंटिंग कोच आन्वी यांच्याकडून जाणून घेऊया परीक्षेच्या दिवशी पालकांनी विचारलेले असे कोणते प्रश्न आहेत जे मुलांना टेन्शन देण्यासोबत त्यांचा आत्मविश्वासही कमी करतात.

परीक्षेच्या दिवशी मुलांना विचारू नका हे प्रश्न

तयारी पूर्ण झाली आहे का?

बहुतेक पालकांनी परीक्षेच्या दिवशी हा प्रश्न आपल्या पाल्याला विचारला असेल. मात्र स्वतःचा तणाव कमी करण्यासाठी आणि त्यांच्या मनाला शांती मिळावी यासाठी ते हा प्रश्न मुलांना विचारतात. परंतु पालकांनी हा प्रश्न मुलाला विचारू नये. तुमचा हा प्रश्न तुमच्या मुलाचा आत्मविश्वास कमी करू शकतो आणि त्याचा ताण वाढवू शकतो.

तू तो धडा नीट पाठ केला होतास ना?

बहुतेक माता त्यांच्या मुलांना हा प्रश्न विचारतात. परंतु परीक्षेच्या दिवशी असे प्रश्न विचारून तुमच्या पाल्याला अधिक घाबरून आणि गोंधळात टाकू नका.

मागे केलेल्या चुका पुन्हा करू नको

पालक अनेकदा परीक्षेच्या दिवशी मुलांना हा सल्ला देतात. तुम्हीही हे करत असाल तर असे करू नका. असे केल्याने मुलाला त्याच्या भूतकाळातील चुका आठवू लागतात. ज्यामुळे त्याचा गोंधळ वाढू शकतो.

एकही प्रश्न सोडू नको

परीक्षेच्या दिवशी अनेकदा पालक नकळत एकही प्रश्न सोडू नको असे सांगून मुलांवर दबाव टाकू लागतात. पण हे सांगताना मुलावर दडपण येते.

पेपर कसा होता

असे क्वचितच कोणी पालक असतील ज्यांनी हा मुलांना विचारला नसेल. या प्रश्नाचे उत्तर परीक्षा देणाऱ्या मुलापेक्षा पालकांना अधिक जाणून घ्यायचे असते. पेपर कसा होता, पेपरमध्ये काय आले, तुला अजून मेहनत करावी लागेल, असे काही प्रश्न विचारले तर त्याचा मुलाच्या पुढील पेपरवर वाईट परिणाम होऊ शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग