Mind Body Wellness Day : वयाच्या तिशीनंतर प्रत्येकाने वर्षातून दोनदा या टेस्ट आवर्जून कराव्यात!-everyone after the age of 30 should get these tests done twice a year ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mind Body Wellness Day : वयाच्या तिशीनंतर प्रत्येकाने वर्षातून दोनदा या टेस्ट आवर्जून कराव्यात!

Mind Body Wellness Day : वयाच्या तिशीनंतर प्रत्येकाने वर्षातून दोनदा या टेस्ट आवर्जून कराव्यात!

Jan 03, 2024 11:35 AM IST

Blood Test After Age of 30: मानवी मन आणि शरीर समजून घेण्यासाठी दरवर्षी ३ जानेवारी हा आंतरराष्ट्रीय मन-शरीर निरोगीपणा दिवस म्हणून साजरा केला जातो.

International Mind-Body Wellness Day 2024 significance
International Mind-Body Wellness Day 2024 significance (Freepik)

Health Care: एका विशिष्ट वयानंतर आपल्या शरीरात अनेक बदल होतात. हे बदल आजारही घेऊन येऊ शकतात. वयाच्या ३० वर्षानंतर आपली मेटाबॉलिज्म क्रिया मंद होऊ लागते. कॅलरीज बर्न करायला वेळ लागतो. असे झाल्यास वजनही वाढू लागते. याशिवाय रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह, हृदयविकार इत्यादींचा धोकाही वाढत्या वयाबरोबर वाढतो. त्यामुळे नियमित शाररिक तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी नियमितपणे काही टेस्ट करणेही गरजेचे आहे. हे तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून वाचवेल. आज जगभरात आंतरराष्ट्रीय माइंड-बॉडी वेलनेस डे (International Mind-Body Wellness Day 2024) साजरा केला जात आहे. निरोगी राहण्यासाठी वर्षभरात कोणत्या चाचण्या केल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात.

रक्तातील साखरेची चाचणी

१२ तासांच्या फास्टिंग नंतर अर्थात उपवासानंतर रक्त तपासणी केल्याने मधुमेहाचे निदान होते. सध्या मधुमेह ही ग्लोबल समस्या बनली आहे. याची ओळख वेळच होणेच गरजेचे आहे. यासाठीच वयाच्या तिशी नंतर आवर्जून मधुमेहाची टेस्ट करावी.

Weight loss tips: या नियमाचं करा पालन, वजन कमी करण्यास होईल मदत!

पॅप स्मीअर चाचणी

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग शोधण्यासाठी पॅप स्मीअर चाचणी केली जाते. गर्भाशयाच्या मुखातील कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे पटकन समजत नाही. गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाव्यतिरिक्त, इतर एचपीव्ही संसर्ग तपासण्यासाठी पॅप स्मीअर चाचणी महत्त्वपूर्ण आहे.

Water Intake: हिवाळ्यात किती पाणी पिणे आहे आरोग्यदायी? जाणून घ्या!

रक्तदाबाची तपासणी

आरोग्य तज्ञांच्या मते, रक्तदाब वर्षातून किमान दोनदा तपासला पाहिजे, विशेषतः जर: तुमचा रक्तदाब सामान्य मर्यादेत नसेल तर. कुटुंबातील कोणाला उच्च रक्तदाब असल्यास. जर गर्भधारणेदरम्यान तुमचा रक्तदाब जास्त असेल.

World Introvert Day 2024: तुम्ही इन्ट्रोव्हर्ट आहात की नाही हे कसं ओळखायचं? जाणून घ्या सवयी!

रक्त तपासणी (CBC)

अ‍ॅनिमिया, संसर्ग आणि काही प्रकारचे कर्करोग यासह अनेक समस्या शोधण्यासाठी ही टेस्ट महत्त्वपूर्ण आहे. विशेषत: स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता जाणवते. वेळेवर निदान झाल्यास आवश्यक पूरक आहार घेता येतो. सीबीसीचा अहवाल ठीक आला तरीही दरवर्षी टेस्ट करावी.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग