मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  वाढत्या वयातील मुलांना नक्की शिकवा या ७ गोष्टी, आयुष्यभर वाटेल अभिमान

वाढत्या वयातील मुलांना नक्की शिकवा या ७ गोष्टी, आयुष्यभर वाटेल अभिमान

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 21, 2022 02:55 PM IST

मुलांना शिष्टाचाराच्या सोबतच चांगले आणि वाईट यातील फरक समजावून सांगणे थोडे अवघड वाटेल. पण जर तुम्ही याची सुरुवात तुमच्या घरापासून केली तर तुमची समस्या थोडी सोपी होऊ शकते. मुलांच्या वाढत्या वयातच मुलांना या ७ गोष्टी शिकवल्या पाहिजे.

मुलांना शिकवा चांगल्या गोष्टी
मुलांना शिकवा चांगल्या गोष्टी

Good Manners to Teach Your Kids: सर्वच पालकांना आपल्या मुलाने मोठे व्हावे आणि एक चांगला माणूस व्हावा, मोठ्यांचा आदर करावा, कधीही चुकीच्या मार्गावर जावू नये असे वाटते. मुलांना शिष्टाचार शिकवताना चांगले आणि वाईट यातील फरक समजावून सांगणे सुद्धा महत्त्वाचे आहे. हे काम अवघड वाटत असले तरी ती मुलांच्या वाढत्या वयात त्यांना हे शिकवले तर ते सोपे होऊ शकते. मुलांसाठी त्यांचे पालक एक उदाहरण आहेत. त्यांच्या खऱ्या आयुष्यातही ते त्यांच्या पालकांना पाहून खूप काही शिकतात. अशा वेळी जर तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान बाळगायचा असेल तर त्यांना लहानपणापासून या 7 गोष्टी शिकवा.

संयम शिकवाः आज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची घाई आहे. आजच्या काळात बहुतांश लोकांमध्ये संयमाचा अभाव दिसून येतो. अशा परिस्थितीत मुलांना संयम बाळगायला शिकवा. त्यांना सांगा की त्यांनी ते करण्याची घाई केली नाही तरच त्यांचे कार्य यशस्वी होईल.

शेअरिंग शिकवाः लहानपणापासूनच तुमच्या मुलांना शेअर करण्याची सवय लावा. हे गुण शिकवल्याने त्यांना जीवनात त्यांचे नाते मजबूत करण्यात मदत मिळेल. तुमच्या घरात येणारी गोष्ट फक्त मुलांसाठी नाही, हे त्यांना शिकवा. असे केल्याने मुलाची मानसिक विकास होतो आणि शेअरिंगमुळे ते इतर मुलांसोबत मिक्स व्हायला देखील चांगले जमते.

प्रामाणिकपणा शिकवाः तुमच्या मुलाला प्रामाणिक बनवा. त्यासाठी त्यांना लहानपणापासूनच प्रामाणिकपणाचे धडे शिकवायला सुरुवात करा. दररोज प्रार्थना करण्याची सवय लावा. प्रार्थना करून मुलांमध्ये सकारात्मकता वाढते.

मदत करायला शिकवाः मुलांना गरजू व्यक्तीला मदत करायला शिकवा. हे करत असताना केवळ ओळखीचेच नाही तर अनोळखी लोकांनाही मदत करायला पुढे या.

वेळेची कदर कराः आपल्या मुलांना वेळेची कदर करायला शिकवा. मुलाला सर्व काही वेळेवर आणि अचूकपणे करण्यास शिकवा. याशिवाय मुलाला निष्काळजीपणे वागण्यापासून रोखा.

अनावश्यक मागण्या पूर्ण करू नकाः आपल्या मुलाला जे आवडते ते आणणे आणि देणे आवश्यक नाही. जेव्हा मूल एखाद्या अनावश्यक गोष्टीची मागणी करते तेव्हा तुम्ही त्याला समजावून सांगा की ही गोष्ट त्याच्यासाठी काही उपयोगाची नाही.

स्वतःची शिस्त पाळाः तुम्ही तुमच्या मुलाला चांगले शिष्टाचार आणि शिस्त तेव्हाच शिकवू शकाल जेव्हा तुम्ही स्वतः त्यांचे पालन कराल. तुमचा मुलगा तुम्हाला जे करताना पाहतो तेच करेल. जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही, तर तुमचे मूलही तसे करणार नाही. उदाहरणार्थ, मुलांना शिकवा की कोणी तुम्हाला काही दिले तर त्यांनी आभार मानले पाहिजेत. त्याला हे देखील शिकवा की दोन वडिलधाऱ्यांमध्ये बोलू नये, कोणाकडून काही घेताना त्याची परवानगी घ्यावी.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel