भारतात मोबाईल क्रमांकाच्या सुरुवातीला +९१ का वापरले जाते? काय आहे त्यामागचे कारण? वाचा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  भारतात मोबाईल क्रमांकाच्या सुरुवातीला +९१ का वापरले जाते? काय आहे त्यामागचे कारण? वाचा

भारतात मोबाईल क्रमांकाच्या सुरुवातीला +९१ का वापरले जाते? काय आहे त्यामागचे कारण? वाचा

Feb 03, 2025 01:20 PM IST

Do You Know: भारतातील प्रत्येक मोबाईल नंबर +९१ ने का सुरू होतो, त्यामागचे कारण जाणून घेऊयात.

भारतात मोबाईल क्रमांकाच्या सुरुवातीला +९१ का वापरले जाते? जाणून घ्या
भारतात मोबाईल क्रमांकाच्या सुरुवातीला +९१ का वापरले जाते? जाणून घ्या

Explainer: धावत्या पळत्या जगात मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. फोनवर बोलण्यापासून तर, इंटरनेट वापरण्यापर्यंत अनेक महत्त्वांच्या गोष्टी मोबाईलमुळे सोप्या झाल्या आहेत. परंतु, तुम्ही कधी असा विचार केला आहे की, भारतातील प्रत्येक मोबाईल क्रमांकाच्या पुढे +९१ हा क्रमांक कशासाठी असतो? अनेकांना हे माहिती असेल. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

भारताला हा कोड कोणी दिला?

+९१ हा देशाचा कोड आहे. पण भारताला हा कोड कशासाठी आणि कोणत्या आधारावर आधारवर देण्यात आला? यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. भारतात +९१ हा देश कोड वापरला जातो तर, इतर देशांमध्ये तो वेगळा आहे. प्रत्यक्षात या कोडला इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन म्हणतात, जी एक एजन्सी आहे आणि संयुक्त राष्ट्रांचा अविभाज्य भाग देखील आहे. हा कोड काय असेल? हे फक्त या एजन्सीद्वारेच ठरवले जाते. याचा मूळ उद्देश देशातील संचार व्यवस्था जगभरात सुरळीत आणि पद्धतशीरपणे चालवणे हे आहे.

प्रत्येक देशासाठी वेगळा कोड

भारताला देण्यात आलेला हा कंट्री कोड देशांतर्गत वापरला नाही तरी, काही फरक पडत नाही. परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावर फोन करण्यासाठी हा कोड वापरणे बंधनकारक आहे. हा कोड आंतरराष्ट्रीय कॉलिंग लक्षात घेऊन वापरला गेला. जगभरातील १९३ देश हा कोड वापरतात, जो प्रत्येक देशासाठी वेगळा आहे. युनायटेड स्टेट्सचा देश कोड +१ हा आहे, युनायटेड किंगडमचा +४४ आहे आणि चीनचा +८६ आहे.

कंट्री कोडचा उद्देश काय?

आयटीयूने देश कोडची प्रणाली विकसित केली. त्यावेळी प्रत्येक देशाला वेगळा कोड देण्यात आला. भारताला +९१ हा कोड देण्यात आला. आंतरराष्ट्रीय कॉलिंग सुव्यवस्थित करण्याची गरज भासू लागल्यानंतर सर्वात प्रथम १९६० साली कंट्री कोड वापरण्यात आला. कारण, त्यावेळी जगभरात दूरसंचार नेटवर्क झपाट्याने वाढत होते. विविध देशांमधील कॉलिंग सुरळीत करण्यासाठी एक मानक प्रणाली आवश्यक असल्याने कंट्री कोडचा वापरण्यात आला.

Whats_app_banner