Social Media: जर तुम्ही चहा-प्रेमी असाल, तर तुम्हाला सोशल मीडियावर अनेकदा शेअर केलेल्या चहाच्या नवीन रेसिपी बघत असाल. अशाच एका रेसिपीचा व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला असून त्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. या क्लिपमध्ये नारळाच्या करवंटीमध्ये चहा तयार होताना दिसत आहे. डिजिटल क्रिएटर कविता राय यांनी हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. “नारळाच्या करवंटीमध्ये चहा,” तिने व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले.
कोणीतरी गॅस बर्नरवर पोकळ नारळाची करवंटी ठेवत असल्याचे दाखवण्यासाठी व्हिडीओ सुरु होतो. त्यानंतर ते पेय तयार करण्यासाठी दूध, साखर, चहाची पाने, आले आणि वेलची पूड यांसारखे वेगवेगळे साहित्य टाकण्यास सुरुवात होते. व्हिडिओचा शेवट स्क्रीनवरील मजकूरामध्ये लिहलेले दिसते “नारळाचा चहा.”
बघा व्हायरल व्हिडीओ
हा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता. शेअर केल्यापासून ही क्लिप व्हायरल झाली आहे. आत्तापर्यंत, याने ४७.२ दशलक्षाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे आणि संख्या फक्त वाढत आहे. याव्यतिरिक्त, पोस्टवर अनेक लाइक्स आणि कमेंट्स जमा झाल्या आहेत. काहींना ही पद्धत प्रभावित झाली, तर काहींनी असा युक्तिवाद केला की अशा प्रकारे चहा बनवणे धोकादायक आहे.
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
"छान. पण असा डिस्क्लेमर असावा की अशा प्रकारे चहा बनवण्यामुळे आगीचा धोका असू शकतो,” असे एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले. “आता मला माहित आहे की मी जंगलात हरवलो आणि चहा बनवायला भांड नसेल तर काय करावे, ही कल्पना आवडली! हे कॅम्पिंगसाठी खरोखर चांगले आहे,” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहले. “चहा बनवण्याची अनोखी संकल्पना,” तिसऱ्याने कौतुक केले. “यम मला प्रयत्न करायला आवडेल,” चौथ्याने व्यक्त केले. व्हिडीओबद्दल तुमचे काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
संबंधित बातम्या