
Rava and Potato Bread Roll Recipe: संध्याकाळी लागलेली थोडीशी भूक भागवण्यासाठी चहासोबत काहीतरी खाल्ले जाते. समोसा, पकोडा किंवा सँडविच हे प्रकार मोठ्या आवडीने खाल्ले जातात. पण तुम्हाला काहीतरी वेगळं आणि क्रिस्पी खायची इच्छा असेल तर तुम्ही रवा आणि बटाट्यापासून टेस्टी ब्रेड रोल बनवू शकता. हा रोल खायला टेस्टी आणि बनवयाला सोपा आहे. चला तर जाणून घ्या रवा आणि बटाटा ब्रेड रोलची रेसिपी
- २ उकडलेले बटाटे
- १ कांदा
- ३ हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- १/४ चमचा ओवा
- काळी मिरी पावडर
- लाल तिखट,
- अर्धा चमचा चाट मसाला
- १ टीस्पून धने पावडर
- भाजलेले जिरे अर्धा चमचा
- हळद
- चवीनुसार मीठ
- १ कप रवा
- २ कप पाणी
- काश्मिरी लाल तिखट
- हळद
- १ चमचा तेल
- १ चिमूटभर मीठ
हे क्रिस्पी रोल बनवण्यासाठी सर्वप्रथम रव्याचे पीठ तयार करा. यासाठी कढईत पाणी गरम करून त्यात हळद, तिखट, मीठ घाला. त्यात रवा घालून मिक्स करा आणि पाणी मंद आचेवर कोरडे करा. जेव्हा पाणी सुकेल आणि पिठाची कंसिस्टंसी येईल तेव्हा गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. बटाट्याचे फिलिंग बनवण्यासाठी उकडलेले बटाटे मॅश करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घाला. ओवा, कोथिंबीर, काळी मिरी पावडर, चाट मसाला, भाजलेले जिऱ्याची पावडर आणि मीठ घालून मिक्स करा. आता हाताला तेल लावा आणि रव्याचे पीठ चांगले मळून घ्या.
ब्रेड रोल बनवण्यासाठी तळहातावर पाणी लावून एका छोटा गोळा रव्याचे पीठ घ्या ते सपाट करा. त्याच्या मध्यभागी बटाट्याचे फिलिंग भरा आणि ते सर्व बाजूंनी नीट बंद करा. तळव्याच्या मदतीने त्याला ब्रेड रोलचा आकार द्या. याप्रमाणे सर्व ब्रेड रोल तयार करा. कढईत तेल गरम करून त्यात हे सोनेरी होईपर्यंत तळा. तुमचे रवा आणि बटाट्याचे ब्रेड रोल तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या
