Engineer's Day 2024: का साजरा होतो इंजिनिअर्स डे? काय आहे या तारखेचा इतिहास आणि महत्व?-engineers day 2024 why is day celebrated what is the history and significance of this date ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Engineer's Day 2024: का साजरा होतो इंजिनिअर्स डे? काय आहे या तारखेचा इतिहास आणि महत्व?

Engineer's Day 2024: का साजरा होतो इंजिनिअर्स डे? काय आहे या तारखेचा इतिहास आणि महत्व?

Sep 15, 2024 08:58 AM IST

History of Engineers Day: इंजिनिअर्स डे १५ सप्टेंबरलाच का साजरा केला जातो? यामागे एक मोठे कारण आहे. याबाबत जाणून घेणार आहोत.

History of Engineers Day
History of Engineers Day (freepik)

 Who was Dr. Visvesvaraiya:  भारतात दरवर्षी १५ सप्टेंबर हा अभियंता दिन अर्थातच इंजिनिअर्स डे म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला माहीत आहे का? इंजिनिअर्स डे १५ सप्टेंबरलाच का साजरा केला जातो? यामागे एक मोठे कारण आहे. सर एम. विश्वकर्मा. पूर्ण नाव- मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, ज्यांना सर ही पदवी देण्यात आली होती. भारतातील ते महान अभियंते ज्यांना भारतरत्न देण्यात आला. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटकात झाला. त्यांना अभियांत्रिकीचे जनक देखील म्हटले जाते. आज आपण इंजिनिअर्स डे का साजरा केला जातो याबाबत जाणून घेणार आहोत.

कोण होते सर एम.विश्वेश्वरैय्या-

सर एम. विश्वेश्वरैय्या हे भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व कामगिरी आणि योगदानासाठी ओळखले जातात. ते एक प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर, विद्वान आणि राजकारणी होते ज्यांनी भारताच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

सर एम.विश्वेश्वरैय्या यांनी काय केले?

कावेरी नदीवर बांधलेले कृष्णा राजा सागर धरण हे एम. विश्वेश्वरैय्यांच्या प्रसिद्ध योगदानांपैकी एक आहे. हे धरण त्या काळातील सर्वात मोठ्या जलाशयांपैकी एक होते आणि दक्षिण भारताच्या विकासात मोठी भूमिका बजावली. हा प्रकल्प आजही त्या परिसरातील शेती आणि पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा आहे.याशिवाय सर एम.विश्वेश्वरैय्या यांनी सिंचन आणि पूरनियंत्रण क्षेत्रातही भरपूर काम केले. त्यांनी अनेक धरणे, पूल आणि पाणी वितरण प्रकल्पांची रचना केली, आहे. ज्यामुळे भारतातील कृषी आणि औद्योगिक विकासाला गती मिळाली.त्यांनी मुंबईच्या बंदर परिसरात पुराचा सामना करण्यासाठी ड्रेनेज सिस्टमची रचना केली होती. हे देखील त्यांच्या महान कामगिरीमध्ये गणले जाते. देशात तंत्रशिक्षणाचा प्रसार करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

'इंजिनिअर्स डे'चे महत्व-

भारतातील अभियंता दिवस म्हणजेच इंजिनिअर्स डे केवळ सर एम. विश्वेश्वरैय्यांच्या योगदानाचे आभार मानण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जात नाही. तर, देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व अभियंत्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे.

इंजिनिअर्स डे का साजरा होतो?

अभियंता दिनाचे उद्दिष्ट विद्यार्थी आणि तरुणांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये करिअर करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. अभियंता दिवस आपल्याला तांत्रिक नवकल्पना आणि अभियांत्रिकीच्या मदतीने आपण आगामी आव्हाने कशी सोडवू शकतो याची आठवण करून देतो.

भारतात पहिला इंजिनिअर्स डे कधी साजरा झाला होता?

अभियंता दिवस जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. युनेस्कोने घोषित केलेला जागतिक अभियांत्रिकी दिवस ४ मार्च रोजी साजरा केला जातो. तथापि, भारतातील अभियांत्रिकी दिनाचा इतिहास सुमारे ५६ वर्षांचा आहे. १९६८ मध्ये प्रथमच अभियंता दिन अर्थातच इंजिनिअर्स डे साजरा करण्यात आला. १९६२ मध्ये एम. विश्वेश्वरैय्या सरांच्या निधनानंतर, त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी १५सप्टेंबर ह अभियंता दिवस म्हणून घोषित करण्यात आला होता.

Whats_app_banner
विभाग