Electric Geyser: थंडीत गिझर वापरताय? मग अवश्य लक्षात ठेवा 'या' गोष्टी, टळेल मोठा धोका
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Electric Geyser: थंडीत गिझर वापरताय? मग अवश्य लक्षात ठेवा 'या' गोष्टी, टळेल मोठा धोका

Electric Geyser: थंडीत गिझर वापरताय? मग अवश्य लक्षात ठेवा 'या' गोष्टी, टळेल मोठा धोका

Nov 15, 2024 02:40 PM IST

Tips for turning on geyser: एकंदरीत आज गिझरमुळे फक्त आंघोळच नाही तर घरातील अनेक कामे सोपी झाली आहेत. मात्र, ते वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

How to use geyser
How to use geyser

How to use geyser: हिवाळा सुरू होताच थंड पाण्याची दहशत टाळण्यासाठी जवळपास प्रत्येक घरात गिझरचा वापर सुरू होतो. जेव्हा जेव्हा गरम पाण्याची आवश्यकता असेल तेव्हा फक्त एक स्विच चालू करा आणि काही मिनिटांत भरपूर गरम पाणी मिळेल. एकंदरीत आज गिझरमुळे फक्त आंघोळच नाही तर घरातील अनेक कामे सोपी झाली आहेत. मात्र, ते वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. गीझरचा स्फोट झाला किंवा कुणाला विजेचा शॉक लागल्याची बातमी तुम्ही ऐकली असेल. या सर्व गोष्टी तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून गिझर वापरताना खूप काळजी घेण्याची गरज आहे हे सांगण्यासाठी आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही गरम पाण्याचा आनंद घेऊ शकाल.

योग्य वेळी बंद करा-

अनेक वेळा असे घडते की, गिझर चालू केल्यानंतर लोक ते बंद करायला विसरतात. जे खूप धोकादायक आहे. वास्तविक, गीझरची क्षमता खूप जास्त असते. त्यामुळे तो बराच वेळ चालू ठेवल्यास त्याचा स्फोट होण्याचा धोका वाढतो. आजकाल ऑटोमॅटिक स्विच असलेले गिझर आले आहेत जे पाणी गरम झाल्यावर आपोआप बंद होतात. पण अजूनही अनेक घरांमध्ये जुने गिझर वापरले जात आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गिझर वापरल्यानंतर तो बंद करायला विसरू नका.

बाथरूममध्ये गीझरसह एक्झॉस्ट फॅन लावावा-

बाथरूममध्ये गीझरसह एक्झॉस्ट फॅन बसवणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तविक, गिझरमध्ये आढळणारे ब्युटेन आणि प्रोपेन वायू कार्बन डायऑक्साइड तयार करतात. जे बाथरूममध्ये जमा होऊ लागतात. हा वायू शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. अशा परिस्थितीत एक्झॉस्ट फॅनचा वापर केल्यास हा गॅस बाथरूममध्ये जमा होत नाही आणि आरोग्यालाही हानी पोहोचत नाही.

मेकॅनिककडून गिझर बसवून घ्या-

जर तुम्ही तुमच्या घरात नवीन गिझर आणले असेल तर ते बसवण्यासाठी मेकॅनिकची मदत घ्या. स्वतः बसवायचा प्रयत्न करू नका. खरे तर गीझरची प्रत्येक वायर योग्य प्रकारे जोडली गेली नाही तर, ती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ते बसवण्यासाठी चांगल्या मेकॅनिकची मदत घ्या.

Get the geyser fitted by a mechanic
Get the geyser fitted by a mechanic (freepik)

नेहमी उंचावर बसवा-

विजेवर चालणाऱ्या गिझरमधून विजेचा धक्का लागण्याचा धोका नेहमीच असतो. अशा परिस्थितीत गिझर नेहमी थोड्या उंचीवर बसवा. यामुळे गीझरवर पाणी पडण्याचा धोका कमी होतो. ज्यामुळे शॉक लागण्याची शक्यताही कमी होते. याशिवाय, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी, नेहमी मुलांच्या आवाक्याबाहेर असलेल्या ठिकाणी गिझर लावा. शक्यतो मुलांसाठी गिझर चालू आणि बंद करण्याचे काम तुम्ही करावे.

पाण्याशिवाय चालू करू नका-

गिझर चालवताना हे लक्षात ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही गिझर चालू कराल तेव्हा लक्षात ठेवा की गिझरमध्ये पाणी उपलब्ध आहे. पाण्याशिवाय गीझर चालू करू नका कारण असे केल्याने गिझरचा स्फोट होऊ शकतो. याशिवाय गीझरमधून कोणताही विचित्र आवाज येत असल्यास तो ताबडतोब बंद करा आणि इलेक्ट्रीशियनकडून तपासणी केल्याशिवाय तो चालू करू नका.

 

 

Whats_app_banner