Mutton Biryani Recipe: मटण बिर्याणी शिवाय बकरी ईद अपूर्ण आहे. बकरी ईदच्या शुभ दिवशी सहसा घरीच ईद स्पेशल पदार्थ तयार केले जातात. भारतात १७ जून रोजी बकरी ईद हा सण साजरा केला जात आहे. बकरी ईद, ज्याला कुर्बानीचा सण म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी मुस्लिम भाविक मशिदीत जाऊन सकाळच्या नमाजाने दिवसाची सुरुवात करतात. ईद स्पेशल मेजवानीचे आयोजन घरीच केले जाते. शीर खुरमा, खीर, बिर्याणी आणि कबाब सारखे स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात आणि प्रियजनांसह त्याचा आस्वाद घेतला जातो. हा खास दिवस साजरा करताना तुम्ही घरी स्पेशल बिर्याणी बनवण्याचा विचार करत असाल तर हैदराबादी मटण बिर्याणीची ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप सोपी आहे. जाणून घ्या रेसिपी
- मटण ५०० ग्रॅम
- मीठ चवीनुसार
- शाही जिरे २ टीस्पून
- वेलची ४-५
- दालचिनी १ लहान तुकडा
- हळद १ १/२ टीस्पून
- लाल तिखट १ टीस्पून
- जावित्री पावडर १/२ टीस्पून
- वेलची पूड १ टीस्पून
- लसूण पेस्ट १ टीस्पून
- आले पेस्ट १ टीस्पून
- हिरवी मिरची २
- कांदा ३/४ कप
- पुदिन्याची पाने १ कप
- दही १ १/२ कप
- तेल १/४ कप
- बासमती तांदूळ (भिजवलेले) २ कप
- पाणी ३ लीटर
- मीठ ३ टेबलस्पून
- वेलची ३-४
- हिरवी मिरची १
ब्लँच केलेल्या तांदूळसाठी पाणी १ कप
- केशर चिमूटभर
- देशी तूप २ टेबलस्पून
- पीठ सील करण्यासाठी
मटण मॅरिनेट करण्यासाठी सर्व मॅरिनेशनचे साहित्य एकत्र करून एका भांड्यात ठेवा. नंतर मंद आचेवर मटण मऊ होईपर्यंत शिजवा. मटण कोरडे झाल्यास थोडे पाणी घाला. एका दुसऱ्या भांड्यात पाणी उकळून त्यात मीठ, वेलची आणि मिरची घाला. मिरची आणि मसाले स्किम करा आणि भिजवलेले तांदूळ घाला. तांदूळ अर्धा शिजेपर्यंत शिजवा. आता अर्धा शिजलेला भात गाळून घ्या आणि शिजवलेल्या मटणावर घाला. भाताला चमच्याने मटणावर नीट पसरवून त्यात एक चमचा भाताचे गाळलेले गरम पाणी घाला. आता त्यात दोन चमचे तूप घाला आणि भिजवलेले केशर ब्राऊन कांद्यासोबत घाला.
आता हे भांडे पीठ आणि घट्ट झाकणाने सील करा. एक मिनिट हाय फ्लेमवर शिजवा आणि नंतर गॅस कमी करा आणि दमवर सुमारे १५ मिनिटे शिजवा. गॅसवरून काढून घ्या आणि झाकण उघडण्यापूर्वी दहा मिनिटे तसेच राहू द्या. तुमची मटणी बिर्याणी तयार आहे. गरमागरम बिर्याणी रायताबरोबर सर्व्ह करा.
(रेसिपी: कुणाल कपूर, शेफ)
संबंधित बातम्या