Homemade De-Tan Face Pack: यावर्षी ११ एप्रिल रोजी ईदचा सण साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत सर्व जण या उत्सवाच्या तयारीत व्यस्त आहेत. ईदचा सण आपल्यासोबत खूप आनंद घेऊन येतो. या दिवशी प्रत्येक घरी विविध प्रकारचे पदार्थ, मिष्टान्न बनवले जातात. याशिवाय नवीन कपडे घालून लोक चांगले तयार होतात. ईदच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी महिलाही अनेक दिवस आधीच तयारी सुरू करतात. ईदच्या दिवशी तुम्ही हवे तसे कपडे घालू शकता, पण जर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो नसेल तर तुमचा लुक खराब होईल. तुमच्याकडे आता पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर काही काळजी करू नका. आपल्या चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी तुम्ही घरीच डी-टॅन फेस पॅक लावू शकता. हा फेस पॅक लगेच चेहऱ्यावर ग्लो आणेल. चला तर मग जाणून घ्या होममेड डी-टॅन फेस पॅक कसे बनवायचे.
डी-टॅन फेस पॅक बनवण्यासाठी तुम्ही कॉफी आणि दही यांचा फेस मास्क बनवू शकता. या फेस पॅकमुळे उन्हापासून आराम मिळू शकतो. हे बनवण्याठी एका बाउलमध्ये २ चमचे कॉफी पावडर घ्या आणि नंतर आवश्यकतेनुसार १ चमचा हळद आणि दही घाला. त्याची घट्ट पेस्ट तयार करा. नंतर हे चेहऱ्यावर लावा आणि किमान १५-२० मिनिटे राहू द्या. नंतर सर्कुलर मोशनमध्ये मसाज करून हा फेस पॅक स्वच्छ करा. कॉफी त्वचेला खोलवर स्वच्छ करते. तर दही त्वचेला ग्लो येण्यास मदत करते. ईदच्या आधी हा फेस पॅक लावा.
ईदच्या आधी चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी तुम्ही मसूर डाळ वापरू शकता. डी-टॅन फेस पॅक घरी तयार करण्यासाठी २ चमचे मसूर डाळ पावडरमध्ये एलोवेरा जेल मिक्स करा. आता या पेस्टमध्ये १ चमचा टोमॅटोचा रस घाला. याची घट्ट पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या. नंतर हा पॅक हलक्या हाताने काढून टाका आणि चेहरा स्वच्छ करा. मसूर चेहऱ्यावरील टॅनिंग झटपट दूर करू शकतो. तर टोमॅटो आणि एलोवेरा त्वचेला हायड्रेट करतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या