Muslim Style Sweet Rice: आज 'ईद-ए-मिलाद-उन-नबी' हा सण साजरा केला जात आहे. दरवर्षी इस्लाम धर्मात रबिउल अव्वलच्या महिन्यात मिलादुन्नबीच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अतिशय खास असतो. कारण या दिवशी इस्लाम धर्माचे सर्वात लोकप्रिय संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी विविध उपक्रम राबवून हा उत्सव साजरा केला जातो. बांधव आपल्या घरात विविध गोडाचे पदार्थ बनवतात. यातीलच एक पदार्थ म्हणजे जर्दा किंवा गोड भात होय.
बासमती तांदूळ, केशर आणि साखर घालून बनवलेली ही एक प्रसिद्ध उत्तर भारतीय तांदळाची पाककृती आहे. ही डिश प्रामुख्याने जेवणानंतर मिष्टान्न म्हणून दिली जाते किंवा विशेष प्रसंगी आणि मुस्लिम सणांच्या वेळी तयार केली जाते. साधारणपणे या डिशचा रंग हलका पिवळा असतो कारण त्यात केशर वापरले जाते.आज आपण खास मुस्लिम स्टाईल जर्दा कसा बनवायचा ते पाहणार आहोत....
-१/४ कप तूप
-८ काजू, बारीक चिरलेले
-५ बदाम, चिरलेले
-२ टीस्पून मनुका
-२ टीस्पून सुके खोबरे
-२ वेलची
-३ लवंग
-१ कप पाणी
-१/४ टीस्पून केसर
-१/४ टीस्पून ऑरेंज फूड कलर, ऐच्छिक
-१/४ बासमती तांदूळ, ३० मिनिटे भिजवलेले
-१/२ कप साखर
-सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात २ टेबलस्पून तूप गरम करा. आता काजू, बदाम, मनुके आणि सुके खोबरे भाजून घ्या.
-हे जिन्नस हलके तपकिरी होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्या आणि नंतर बाजूला ठेवा.
-आता उरलेल्या तुपात वेलची आणि लवंगा घाला.
-तसेच १ कप पाणी,केसर, आणि ऑरेंज फूड कलर घाला. हे सर्व चांगले मिसळा आणि रंग देखील चांगला मिसळला जाईल याची खात्री करा.
-आता यामध्ये अर्धा कप भिजवलेला बासमती तांदूळ घालून मिक्स करा.
-या भांड्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर १० मिनिटे शिजवा. ते चांगले मिसळा आणि तांदूळ अर्धा शिजला आहे याची खात्री करा.
-आता त्यात दीड कप साखर, २ चमचे तूप आणि भाजलेले ड्रायफ्रूट्स घाला.
-सर्व पदार्थ चांगले मिसळा आणि साखर व्यवस्थित वितळेल याची काळजी घ्या.
-पुन्हा झाकण ठेवून तांदूळ ५ मिनिटे शिजू द्या.
-भात तळाला चिकटून करपू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा.
-तांदूळ पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवा. परंतु जास्त शिजवून भात गिच्च करू नका.
-अशाप्रकारे तयार झालेल्या या चविष्ट जर्द्यावर ड्रायफ्रूट्स घालून सर्व्ह करा.