Mutton Cutlet Recipe: रमजानची इफ्तार पार्टी असो किंवा ईदचा आनंद, जर तुम्हाला खास नॉनव्हेज डिश बनवायची असेल आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांना खायला द्यायचे असेल तर मटण कटलेट्सची ही चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. जे लोक नॉनव्हेजचे शौकीन आहेत त्यांना मटण कटलेटची ही रेसिपी खूप आवडते. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे ही बनवायला खूप सोपी आहे. याशिवाय त्याची चव लहान मुलांसह मोठ्यांनाही खूप आवडते. चला तर मग जाणून घ्या घरच्या घरी चविष्ट मटण कटलेट कसे बनवायचे
- अर्धा किलो मटण कीमा
- २ उकडलेले बटाटे
- १ कांदा
- १ अंडे
- १ चमचा आले-लसूण पेस्ट
- २ चमचे कोथिंबीर
- १ कप ब्रेड क्रंब्स
- १ कप तेल
- २ चमचे कॉर्न फ्लोअर
- १ चमचा गरम मसाला
- १ चमचा चिली फ्लेक्स
- चवीनुसार मीठ
मटण कटलेट बनवण्यासाठी प्रथम मटण कीमा धुवून कुकरमध्ये पाणी, आले, लसूण पेस्ट आणि मीठ घालून शिजवून घ्या. यानंतर त्यात उर्वरित सर्व साहित्य मिक्स करा. कीमा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. आता मटणाच्या कीमाचे गोलआकाराचे कटलेट तयार करा. ब्रेडक्रंबमध्ये कोट करा आणि २० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. आता कढईत तेल गरम करून आच कमी करा आणि कटलेट दोन्ही बाजूंनी तळून घ्या.
तळलेले कटलेट पेपर टॉवेलवर काढा. जेणेकरून टॉवेल अतिरिक्त तेल शोषून घेईल. तुमचे मटण कटलेट सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. हे लाल आणि हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करू शकता.
संबंधित बातम्या