मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eid 2024: ईदपूर्वी घराच्या घरी ‘असे’ करा फेशियल, चंद्रासारखा फुलेल तुमचा सुंदर चेहरा!

Eid 2024: ईदपूर्वी घराच्या घरी ‘असे’ करा फेशियल, चंद्रासारखा फुलेल तुमचा सुंदर चेहरा!

Jun 16, 2024 01:39 PM IST

Eid 2024 Facial Tips: बकरी ईदचा सण जवळ येत आहे, त्यामुळे चेहरा चमकदार दिसावा यासाठी फेशियल करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या दिवशी तुमचा चेहरा चंद्रासारखा सुंदर दिसेल. यासाठी घरच्या घरी फेशियल कसे करावे पाहा…

ईदपूर्वी घराच्या घरी ‘असे’ करा फेशियल, चंद्रासारखा फुलेल तुमचा सुंदर चेहरा!
ईदपूर्वी घराच्या घरी ‘असे’ करा फेशियल, चंद्रासारखा फुलेल तुमचा सुंदर चेहरा! (sutterstock)

Eid 2024 Facial Tips: सणासुदीला सर्वात सुंदर दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते. विशेषत: महिला सर्वात सुंदर दिसण्यासाठी अनेक गोष्टी करतात. आता ईदचा सण जवळ येत असून, या दिवशी चमकदार त्वचा हवी असेल तर घरच्या घरीच फेशियल करा.

ट्रेंडिंग न्यूज

चेहरा स्वच्छ करा

फेशियल करण्यापूर्वी तुमचा चेहरा नीट स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही वापरत असलेल्या सर्व गोष्टी त्वचेच्या आत जाऊन त्वचा सुधारू शकतील. चेहरा स्वच्छ करण्यासाठी मध आणि लिंबाचा रस मिसळून बाजूला ठेवावा. हे मिश्रण लावण्यापूर्वी चेहरा पाण्याने धुवा आणि चेहरा हलका ओला केल्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. थोडा वेळ हाताने चेहऱ्यावर चोळा आणि पाण्याने धुवा.

Tooth Pain: अचानक दात दुखू लागलाय? काळजी करू नका! स्वयंपाकघरात ठेवलेल्या ‘या’ गोष्टी येतील कामी

चेहरा स्क्रब करा 

फेशियल करण्याआधी चेहरा स्क्रब केल्याने त्वचेत जमा झालेल्या मृत पेशी दूर होतात आणि चेहरा चमकदार होतो. स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा ग्राऊंड कॉफी, अर्धा चमचा साखर, एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिक्स करावे. या मिश्रणात २-३ थेंब कोमट पाणी घालावे. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा आणि बोटांच्या मदतीने गोलाकार मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून दोन मिनिटे सुकू द्या.

Hair Care: केस कमकुवत होण्यामागे असू शकतात ‘ही’ प्रमुख कारणे! तुम्हीही करत नाही ना या चुका?

चेहऱ्याला वाफ द्या

फेशियलची ही तिसरी आणि महत्त्वाची पायरी आहे. वाफ घेतल्याने चेहऱ्याची रोमछिद्रे उघडतात आणि त्यात अडकलेले धूळ, घाण, तेल आणि मेकअपचे उरलेले कण बाहेर पडतात. त्यासाठी भांड्यात किंवा स्टीमरमध्ये पाणी उकळून घ्यावे. त्यात ग्रीन टी घालावी आणि आता आपला चेहरा भांडी/स्टीमरपासून दूर ठेवून वाफ घ्यावी. दोन-तीन मिनिटे वाफ घ्यावी.

फेस मास्क वापरा

फेस मास्कची स्टेप फॉलो करण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने धुवा, जेणेकरून रोमछिद्रांमधील घाण निघून जाईल आणि छिद्रे परत बंद होतील. असे केल्यानंतर छिद्र घट्ट करण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावा. यासाठी एक चमचा बेसन, अर्धा चमचा मध, चिमूटभर हळद आणि आठ ते दहा थेंब दूध एकत्र मिसळावे. नंतर हे मिश्रण लेप स्वरुपात चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

WhatsApp channel
विभाग