मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Effective Exercises To Reduce Belly Fat Fast More Than Crunches

Belly Fat कमी करण्यासाठी क्रंचेसपेक्षा अधिक प्रभावी आहेत हे व्यायाम, लवकर दिसेल परिणाम

पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम
पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम (Freepik)
Hiral Shriram Gawande • HT Marathi
Sep 18, 2023 10:05 PM IST

Exercises for Belly Fat: पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी अनेकदा क्रंचेस करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु हे व्यायाम स्त्रियांचे सुटलेले पोट कमी करण्यासाठी जलद परिणाम देतात.

Effective Exercises To Reduce Belly Fat: पुरुषांचे सुटलेले पोट असो किंवा प्रेग्नेंसीनंतर स्त्रियांचे मोठे झालेले पोट असो, ते अनेकदा वाईट दिसते. लोक नेहमी म्हणतात की क्रंचेससारखे व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. पण पोटावर साचलेली चरबी कमी करायची असेल तर हे ३ व्यायाम क्रंचेसपेक्षा जास्त परिणामकारक आहेत. जे थेट पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते. हे तीन व्यायाम कोणते आहेत ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

का होत नाही क्रंचेसचा परिणाम?

जर तुम्ही रोज क्रंच करत असाल आणि तरीही तुमचं सुटलेलं पोट कमी होत नसेल, तर हा व्यायाम करणे थांबवा. क्रंचेस केल्याने कोअर मसल्स कमी होत नाहीत आणि त्याचा परिणाम फक्त ऍब्सवर होतो. ज्यामुळे तुमच्या खालच्या भागावर जमा झालेली चरबी बर्न होत नाही. पोटाभोवती चरबी जमा होत असेल तर ती कमी करण्यासाठी हे तीन व्यायाम नियमित करा.

कार्डिओ व्यायाम आहे आवश्यक

तंदुरुस्त राहण्यासाठी फक्त पोटाचा व्यायाम केल्याने कोणताही परिणाम होणार नाही. पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करण्यापूर्वी दररोज कार्डिओ व्यायाम करणे आवश्यक आहे. कार्डिओ एक्सरसाइजसाठी तुम्ही चालणे, जॉगिंग, पोहणे, सायकलिंग करू शकता. याचा थेट परिणाम शरीरातील चरबीवर होतो आणि ते कमी होण्यास मदत होते. यासोबतच बेली फॅटचे स्नायूही कमकुवत होतात. जे कमी करणे सोपे करते.

लेग रेझ

लेग रेझ एक्सरसाइज हा फ्लोअर एक्सरसाइज आहे, जे घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अगदी सहज करता येते. हे करण्यासाठी फक्त तुमच्या पाठीवर झोपा आणि तुमचे दोन्ही पाय हवेत वर उचला आणि त्यांना छातीवर आणण्याचा प्रयत्न करा. नंतर पाय खाली करा आणि ६० अंशांवर थांबा. पाय जमिनीला टेकणार नाहीत हे लक्षात ठेवा. ६० अंशाच्या कोनानंतर पाय पुन्हा वर घ्या. दररोज १५-१५ चे सुमारे ३ सेट केल्याने पोटाची चरबी झपाट्याने कमी होऊ लागते.

 

व्ही सिटअप्स किंवा नौकासन

नौकासन आणि व्ही सिटअप्स हे समान व्यायाम आहेत. यामध्ये पाय आणि कंबर अशा प्रकारे वाकलेली असते की शरीर V चा आकार घेतो. हा व्यायाम दररोज ३ च्या सेटमध्ये केल्याने बेली फॅटचे मसल्स बर्न होण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)