Spinach Side Effects: या प्रकारे पालक खाल्ल्याने शरीराला पोहोचू शकते हानी, काळजी घ्या-eating spinach or palak in this way can harmful for body know its side effects ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Spinach Side Effects: या प्रकारे पालक खाल्ल्याने शरीराला पोहोचू शकते हानी, काळजी घ्या

Spinach Side Effects: या प्रकारे पालक खाल्ल्याने शरीराला पोहोचू शकते हानी, काळजी घ्या

Dec 28, 2023 01:40 PM IST

Spinach or Palak: आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणे फायदेशीर असते. पण तुम्हाला माहीत आहे का पालक कच्चे किंवा या पद्धतीने खाल्ले तर ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. जाणून घ्या पालक कसे खाऊ नये.

पालक खाण्याचे दुष्परिणाम
पालक खाण्याचे दुष्परिणाम (unsplash)

Side Effects of Spinach or Palak: पालक हे हेल्दी भाजी म्हणून ओळखले जाते. पालकमध्ये जवळ-जवळ सर्व आवश्यक खनिजे आणि पोषण असतात. अशा परिस्थितीत पालक खाणे आरोग्यदायी असते. पालक खाल्ल्याने हृदयविकारासोबतच इतर अनेक आजारांपासूनही बचाव होतो. एवढेच नाही तर पालकामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स कॅन्सरपासून बचाव करतात. पण पालक खाण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. अधिक फायदे मिळवण्यासाठी या ३ प्रकारे पालक खाल्ल्यास लगेच काळजी घेणे आवश्यक आहे. या प्रकारे पालक खाल्ल्यास शरीराला हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच काळजी घ्या.

कच्च्या पालकामुळे नुकसान होते

पालकाचे जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी बरेच लोक ते कच्चे खाण्याचा सल्ला देतात. पण कच्चा पालक अजिबात खाऊ नये, असे पोषणतज्ञ सांगतात. पालकामध्ये ऑक्सॅलिक अॅसिड असते, जे शरीरात कॅल्शियम आणि खनिजांना बांधून ठेवते. पण जेव्हा तुम्ही ते कच्चे खाता तेव्हा ते कॅल्शियम, लोह आणि इतर आवश्यक खनिजे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते. त्यामुळे शरीरात किडनी स्टोन तयार होऊ लागतात.

पालकची स्मूदी

अनेक पोषणतज्ञ सांगतात की, पालक स्मूदीमध्ये दही किंवा इतर फळांसोबत स्मूदी बनवून खाल्ले जाते. तर हे देखील हानिकारक आहे. यामुळे पचनशक्ती कमकुवत होते आणि किडनी स्टोनचा धोका वाढतो.

पालकाचा रस

कच्च्या पालकाप्रमाणेच कच्च्या पालकाचा रसही हानिकारक असतो. पालकामध्ये असलेले ऑक्सलेट कॅल्शियमला बांधून ठेवते आणि शरीरात किडनी स्टोनची समस्या निर्माण करते. त्यामुळे या तीन प्रकारे पालक कधीही खाऊ नये. पालकाचे जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी पारंपारिक पद्धतीने गरम पाण्यात ब्लँच करणे महत्वाचे आहे. नंतर ते थंड पाण्याने धुवा आणि पेस्ट करुन वापरा. जेणेकरून शरीराला सर्व आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे मिळू शकतील.

 

जास्त पालक असते हानीकारक

जास्त पालक खाणे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. पालक जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅस, ब्लोटिंग आणि पोटदुखी होऊ शकते. पालकामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे हे होते. इतकेच नाही तर ज्यांना गाउट किंवा संधिवातची समस्या आहे त्यांनी पालक खाणे टाळावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग