मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chana Chaat Recipe: भिजवलेले चणे खाल्ले तर दिवसभर राहाल उत्साही! नोट करा रेसिपी

Chana Chaat Recipe: भिजवलेले चणे खाल्ले तर दिवसभर राहाल उत्साही! नोट करा रेसिपी

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 28, 2023 08:40 AM IST

Healthy Breakfast: चणे हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असून त्यात उर्जेचा खजिना दडलेला आहे. चण्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.

 पौष्टिकतेचा खजिना चना चाट
पौष्टिकतेचा खजिना चना चाट (Freepik )

चना चाटचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चवीने भरलेला चना चाट आरोग्यदायीही असते. चना चाटाने तुम्ही तुमच्या दिवसाची चवदार आणि आरोग्यदायी सुरुवात करू शकता. चना चाट तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो. संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता म्हणूनही खाऊ शकतो. चणे हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असून त्यात उर्जेचा खजिना दडलेला आहे. चण्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. चना चाट बनवायला सोपा आहे आणि कमी वेळेत तयार होतो. चला जाणून घेऊया चना चाट बनवण्याची सोपी रेसिपी.

चना चाट बनवण्यासाठी साहित्य

भिजवलेले काळे चना - १ वाटी

कांदा बारीक चिरून - १/४ कप

टोमॅटो चिरून - ३/४ कप

हिरवी मिरची पेस्ट - १/२ टीस्पून

उकडलेले बटाटे - १/२ कप

कोथिंबीर - २ चमचे

कच्चा आंबा चिरून - १/२ टीस्पून (ऐच्छिक)

लिंबाचा रस - ३-४ टीस्पून

गरम मसाला - १/४ टीस्पून

लाल तिखट - १/४ टीस्पून

चाट मसाला - २ टीस्पून

बटर - २ टेस्पून

मीठ - चवीनुसार

चना चाट कसा बनवायचा?

पौष्टिकतेने युक्त चना चाट बनवण्यासाठी प्रथम काळे हरभरे घ्या आणि स्वच्छ धुवा. आता एका भांड्यात चणे टाका आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी चना गाळून पाणी वेगळे करावे. आता प्रेशर कुकरमध्ये काळे चना टाका आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ४-५ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. यानंतर, गॅस बंद करा आणि कुकरचा दाब आपोआप सुटण्याची प्रतीक्षा करा. यानंतर कुकर उघडून हरभरा गाळून पाणी वेगळे करून चणे एका भांड्यात ठेवा.

आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये बटर घालून मध्यम आचेवर गरम करा. बटर वितळल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, मिरची पावडर, चाट मसाला आणि गरम मसाला घालून टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवा. आता कढईत उकडलेले बटाटे आणि चणे टाका आणि चांगले मिसळा.

बटाटे आणि चना काही वेळ शिजवल्यानंतर त्यात हिरवी कोथिंबीर आणि लिंबाचा रस मिसळा. यानंतर चना चाट २ ते ३ मिनिटे शिजू द्या. मधेच ढवळत राहा. यानंतर गॅस बंद करा. आता चना चाट तयार आहे. गरमागरम सर्व्ह करा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या