Papaya Seeds: चुकूनही खाऊ नका पपईच्या बिया, स्पर्म काउंट कमी करण्यापासून यकृतावर होतो वाईट परिणाम-eating papaya seeds can harmful for health know its side effects ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Papaya Seeds: चुकूनही खाऊ नका पपईच्या बिया, स्पर्म काउंट कमी करण्यापासून यकृतावर होतो वाईट परिणाम

Papaya Seeds: चुकूनही खाऊ नका पपईच्या बिया, स्पर्म काउंट कमी करण्यापासून यकृतावर होतो वाईट परिणाम

Sep 12, 2024 06:10 PM IST

Side Effects of Eating Papaya Seeds: पपईच्या बिया हेल्दी समजून खाण्याची चूक करू नका. ते आरोग्यास अनेक प्रकारे हानी पोहोचवतात.

papaya seeds-  पपईच्या बिया खाण्याचे दुष्परिणाम
papaya seeds- पपईच्या बिया खाण्याचे दुष्परिणाम (pexels)

Eating Papaya Seeds Can Harmful for Health: आजकाल अनेक प्रकारच्या बिया किंवा सीड्स खाण्याचे फायदे सांगितले जातात. भोपळ्याच्या बिया, सूर्यफूलाच्या बिया यांसारख्या फायदेशीर बियांबरोबरच पपईच्या बिया सुद्धा तुम्हाला फायदेशीर वाटत असतील तर थांबा! पपईच्या बिया चुकूनही फायदेशीर समजून खाण्याची चूक करू नका. हे शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते. पपईच्या बिया हानिकारक का आहेत हे समजून घ्या. पपईच्या बिया खाण्याचे दुष्परिणाम आणि ते हानिकारक का आहेत ते येथे जाणून घ्या.

स्पर्मची गुणवत्ता कमी करते

पपईच्या बिया दीर्घकाळ सतत खाल्ल्या तर ते पुरुषांमधील शुक्राणू तर कमी करतातच पण शुक्राणूंची गुणवत्ता सुद्धा कमी करतात. ज्यामुळे मोटॅलिटी रेट कमी होतो. प्राण्यांवरील संशोधनात असे दिसून आले आहे की जेव्हा पपईच्या बिया खाणे बंद केले गेले तेव्हा शुक्राणू कमी होण्याची समस्या कमी होते.

लिव्हरला डॅमेज करते

एनिमल स्टडीमध्ये असे दिसून आले आहे की पपईच्या बियांमध्ये आढळणारा अर्क यकृत पेशींना हानी पोहोचवतो, डीएनए खराब करतो. यामुळे यकृताला तीव्र इजा होते आणि लिव्हर सिरोसिसचा धोका असतो. पपईच्या बिया सतत मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास लिव्हर सिरोसिसचा धोका असतो.

अनवॉन्टेंड प्रेग्नेंसी टाळता येणार नाही

पपईच्या बिया खाल्ल्याने नको असलेली गर्भधारणा टाळता येते, ही संपूर्ण मिथक आहे. बर्थ कंट्रोलसाठी पपईच्या बिया चुकूनही खाऊ नका. उंदरांवर करण्यात आलेल्या संशोधनात कच्ची पपई खाल्ल्याने गर्भाशयात आकुंचन झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कच्च्या पपईच्या बिया खाऊ नयेत. मात्र पिकलेल्या पपईमुळे गर्भाशयाला कोणतेही नुकसान होत नाही.

जास्त प्रमाणात खाल्ल्याने होईल नुकसान

पपईच्या बिया खाल्ल्याने निरोगी पेशींवर वाईट परिणाम होतो आणि पेशींचे नुकसान होते. हे संशोधन उंदरांवर करण्यात आले.

केवळ पपई खाणे आहे फायदेशीर

पपईशी निगडीत जास्तीत जास्त आरोग्यदायी फायदे हवे असतील तर ते बियांशिवाय खा. पपई खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात. पण त्याच्या बिया खाणे टाळा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग