मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eating Disorder: गरजेपेक्षा जास्त किंवा कमी खाणे असतो एक प्रकारचा इटिंग डिसऑर्डर, जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

Eating Disorder: गरजेपेक्षा जास्त किंवा कमी खाणे असतो एक प्रकारचा इटिंग डिसऑर्डर, जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 23, 2024 09:13 PM IST

What is Eating Disorder: किशोरवयीन मुलांमध्ये आहाराच्या सवयी बदलत आहेत. याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झालेला दिसून येतो. अशीच एक समस्या म्हणजे इटिंग डिसऑर्डर. हे काय आहे जाणून घ्या.

इटिंग डिसऑर्डर
इटिंग डिसऑर्डर (unsplash)

Eating Disorder: इटिंग डिसऑर्डर ही समस्या गंभीर असून मानसिक आजार आहे. यामध्ये व्यक्ती गरजेपेक्षा जास्त खातो किंवा कमी खातो. त्यामुळे त्याच्या आरोग्याचा धोका वाढतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे इटिंग डिसऑर्डर कधीही होऊ शकतो. परंतु बहुतेक वेळी तो पौगंडावस्थेत किंवा तरुण वयात होतो.

इटिंग डिसऑर्डरची प्रामुख्याने ३ प्रकारांमध्ये विभागणी केली जाते. त्यापैकी एक म्हणजे एनोरेक्सिया नर्वोसाया असून या समस्येने ग्रासलेले लोक भूक लागली तरी खाणे टाळतात. जास्त व्यायाम केल्याने त्यांचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. बहुतेक किशोरवयीन मुली याला बळी पडतात. दुसरा प्रकार आहे बुलिमिया नर्वोसा, ज्यात वजन वाढू नये म्हणून लोकं त्यांचे आवडते पदार्थ पूर्ण खातात. त्यानंतर ते मुद्दाम उलट्या करतात जेणेकरून त्यांना जेवणाची चव मिळेल. तर तिसरा प्रकार आहे बिंज ईटिंग डिसऑर्डर. या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना दर अर्ध्या तासाच्या अंतराने बिस्किटे, नमकीन, वेफर्स यांसारख्या गोष्टी खाण्याची सवय असते. आपल्या अनियमित किंवा अल्प प्रमाणात खाण्यामुळे इटिंग डिसऑर्डरला बळी पडू शकतो.

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातीलच्या आहारतज्ज्ञ डॉ फौजिया अन्सारी म्हणाल्या की, तुमच्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे बारकाईने लक्ष द्या. त्यामध्ये जर काही बदल आढळले तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. जर तुमच्या मुलाला इटिंग डिसऑर्रडरची समस्या असेल तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा एक गंभीर प्रकारचा मानसिक आजार आहे. हे लक्षात ठेवा की डॉक्टरांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलाला या आजारातून बाहेर पडू शकता. डॉक्टरांची मदत घेणे खूप महत्वाचे आहे. सुरुवातीला तुम्हाला या आजारातून बाहेर पडणे कठीण होऊ शकते. परंतु उपचारानंतर तुमचा आहाराबद्दल सकारात्मक दृष्टीकोन विकसित होईल. ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होईल. या आजाराने त्रस्त मुलांना कुटुंब आणि मित्रांकडून मानसिक आणि भावनिक आधाराचीही गरज भासते.

झायनोवा शाल्बी हॉस्पीटलचे आहारतज्ज्ञ डॉ. जीनल पटेल म्हणाल्या की, इटिंग डिसऑर्डर म्हणजेच आहारा सबंधित विकार असलेल्या काही मुलांना गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (जीईआरडी), इओसिनोफिलिक एसोफॅगिटिस, एलर्जी किंवा इतर वैद्यकीय स्थितींमुळे आहाराबाबत समस्या उद्भवू शकतात. यासाठी विशेष तपासणी आणि लॅब चाचण्यांची आवश्यकता भासू शकते.

 

इटिंग डिसऑर्डरसाठी उपचार केल्यास आपल्याला निरोगी वजन वाढविणे तसेच वजन नियंत्रित राखण्यास मदत होते. हे आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गुंतागुंतींना प्रतिबंध करते. हे मानसिक आरोग्य, संवेदनांचा तिरस्कार आणि अन्नाविषयी भीती देखील दूर करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel