Foods to Stay Healthy and Cool in Summer: उन्हाळ्यात अनेकदा लोक डिहायड्रेशन आणि हीट स्ट्रोकचे बळी ठरतात. लहान मुले असो वा प्रौढ या समस्या कोणालाही होऊ शकतात. याला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड आणि थंड ठेवणे महत्वाचे आहे. हेल्दी आणि कूल राहण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जाणून घ्या.
ताजी फळे आणि भाज्या खा
उन्हाळ्यात कमी चरबीयुक्त, थंड, हलके आणि पौष्टिक असे पदार्थ खा. या काळात ताजी हंगामी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. पीच, चेरी, ब्लॅकबेरी, जर्दाळू, गाजर, द्राक्षे, चेरी टोमॅटो, बीटरूट यांसारखी बेरी आणि स्टोन फळे असलेले फ्रूट सॅलड केवळ फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीन आणि फायबरनेसमृद्ध नसतात तर उन्हाळ्यात देखील प्रभावी असतात. तसेच वजन राखण्यासाठी ते उत्कृष्ट आहे.
योग्य नाश्ता आहे आवश्यक
सकाळी चांगला हायड्रेटेड आणि पौष्टिक नाश्ता करूनच बाहेर पडा. असे न केल्यास डिहायड्रेशन होऊ शकते आणि तुम्हाला चक्कर सुद्धा येऊ शकते. नाश्त्यात तुम्ही अंडी, पनीर, टोफू आणि स्प्राउट्स खाऊ शकता. मात्र हे खाल्ल्यानंतर एक वाटी ताजी फळे नक्कीच खावीत.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या भाज्या जसे की मुळा, ड्रमस्टिक्स, पालक, स्प्रिंग ओनियन्स आणि पाण्याच्या भाज्यांमध्ये मॅंगनीज, जस्त, लोह, कॅल्शियम आणि तांबे यांसारखे आवश्यक सूक्ष्म पोषक घटक असतात. त्यात भरपूर पोषक आणि अँटी ऑक्सिडंट असतात.
हायड्रेटेड राहण्यासाठी प्या हे ड्रिंक्स
उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी लिंबूपाणी, पुदिना, नारळ पाणी, ताक, ताज्या फळांचा रस आणि भाज्यांचा रस प्या. तुमच्या पेयांमध्ये तुळस आणि पुदिन्याची पाने वापरल्याने थंडावा मिळतो.
टरबूज फायदेशीर आहे
जलयुक्त टरबूज हे एक उत्तम हायड्रेटिंग फूड आहे. त्यात कर्करोगाशी लढणारी पिगमेंट असतात आणि कॅलरी कमी असतात. हे घामाने गमावलेले आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स प्रदान करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)