Pumpkin Seeds Benefits: आपण आजकाल फार वेग्वेगळ्या पद्धतीचे पदार्थ खातो. फास्ट फूड खाण्याकडे अनेकांनाच लक्ष आहे. पण आपल्यासाठी आयुर्वदात सांगितलेलेच पदार्थ जास्त उपयोगी आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आयुर्वेदात भाज्या आणि फळांसोबतच त्यांच्या बिया देखील आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. तुम्ही भोपळ्याच्या भाजीबद्दल ऐकले असेल. याची भाजी अनेकांना आवडत नाही. पण याच्या बिया तुम्ही खाल्ल्या आहेत का? याच्या बिया फारच फायदेशीर आहेत. आयुर्वेदात तसेच ॲलोपॅथीमध्ये भोपळ्याच्या बिया रोगांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त मानल्या गेल्या आहेत.
हार्वर्ड हेल्थमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असल्याने शरीराला अनेक मोठ्या आजारांपासून संरक्षण मिळते. त्यांच्या सेवनाने स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यताही कमी होते. या बिया पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. याशिवाय याचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया भोपळ्याच्या बिया शरीराला कोणते फायदे देतात.
> भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने तसेच असंतृप्त फॅटी ऍसिड असतात. त्यामध्ये जस्त, लोह आणि मॅग्नेशियम सारख्या भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात.
> भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर झिंक असते. याच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते.
> भोपळ्याच्या बिया रोज खाल्ल्यास मानसिक आरोग्य सुधारते.
> भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो. कारण यात असलेल्या फायबरमुळे अन्न पचणे सोपे होते.
> भोपळ्याच्या बिया महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग रोखण्यास सक्षम मानल्या जातात. अनेक संशोधनांमध्ये असे म्हटले गेले आहे की त्यांचे सेवन स्तनाचा कर्करोग आणि इतर अनेक प्रकारचे कर्करोग दूर ठेवण्यास मदत करते.
> भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने मधुमेहामध्ये आराम मिळतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या