Pregnancy Care Tips: प्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता टाळण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pregnancy Care Tips: प्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता टाळण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश!

Pregnancy Care Tips: प्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता टाळण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश!

Published Dec 01, 2023 03:40 PM IST

Hemoglobin Increasing Food: गरोदरपणात अनेकदा महिलांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते. अशा परिस्थितीत त्यांनी रोजच्या आहारात काही पदार्थ अवश्य खाल्ले पाहिजे. रक्ताची पातळी कमी होणार नाही.

प्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पदार्थ
प्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पदार्थ (unsplash)

Food to Increase Hemoglobin During Pregnancy: गरोदरपणात शरीरात पुरेसे रक्त असणे गरजेचे असते. अनेक वेळा महिलांना प्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेचा त्रास होतो. हिमोग्लोबिन शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते. प्रेग्नेंसीदरम्यान बाळाच्या चांगल्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी अधिक लाल रक्तपेशींची आवश्यकता असते. जर तुम्हाला गर्भधारणेदरम्यान जास्त थकवा आणि चक्कर येत असेल तर हे हिमोग्लोबिनच्या कमतरतेची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत महिलांनी आहारात योग्य पदार्थांचा समावेश करावा. जेणेकरून रक्ताची कमतरता भरून काढता येईल. गरोदरपणात एनिमिया टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे फायदेशीर ठरते.

गूळ किंवा गुळाचा चहा

शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास गुळाचे सेवन करावे. गुळात पुरेशा प्रमाणात लोह असते. रोज गुळाचा चहा प्यायल्याने अॅनिमियाची समस्या कमी होते.

व्हिटॅमिन सी असलेली फळे

शरीरातील रक्ताची कमतरता टाळण्यासाठी व्हिटॅमिन सीचे प्रमाण पुरेसे असावे. कारण लोहयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ शरीरात लोह शोषून घेण्यास मदत करतात. त्यामुळे संत्री, मोसमी, आवळा ही फळे खावीत.

हे ड्राय फ्रूट्स खा

मनुका, अंजीर, खजूर गरोदरपणात अवश्य खावेत. हे ड्राय फ्रूट्स रोज खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

हिरव्या भाज्या

ज्या भाज्यांमध्ये फॉलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते त्यांचा आहारात समावेश केल्याने रक्ताची कमतरता किंवा अॅनिमिया दूर होण्यास मदत होते. हिरव्या पालेभाज्या, भेंडी, सलगम यांसारख्या भाज्या हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करतात.

 

हे पदार्थ सुद्धा नक्की खा

गरोदरपणात रोजच्या आहारात डाळिंब, गाजर, बीटरूट, सफरचंद यांसारख्या फळांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. या फळांमुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता होत नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner