2024 मध्ये आजारांपासून राहायचं असेल दूर, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खा या ७ गोष्टी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  2024 मध्ये आजारांपासून राहायचं असेल दूर, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खा या ७ गोष्टी

2024 मध्ये आजारांपासून राहायचं असेल दूर, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खा या ७ गोष्टी

Dec 31, 2023 02:52 PM IST

New Year Health Tips: नवीन वर्षात निरोगी राहण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही संकल्प करतात. संकल्प करण्यासोबतच तुम्ही आहारात काही भाज्या आणि फळे ठेवू शकता. याने तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील मजूबत होईल.

नवीन वर्षात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार
नवीन वर्षात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार (unsplash)

Foods to Increase Immunity: आजारांपासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर सर्दी, खोकला यासारख्या आजारांचा धोका वाढतो. तुमची इम्युनिटी सिस्टम शरीरातील अवयव, पांढऱ्या रक्त पेशी, प्रथिने (अँटीबॉडीज) आणि रसायनांचे मोठे जाळे असते. जे एकंदरीत बॅक्टेरिया, व्हायरस आणि परजीवीपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी कार्य करते. २०२४ मध्ये आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रतिकारशक्ती मजबूत करा. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. यासोबतच शारीरिक हालचाली, चांगली झोप इत्यादी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. अँटी ऑक्सिडेंट, अँटी व्हायरल आणि अँटी इंफ्लामेटरी गुण असलेले असे कोणते पदार्थ आहारात घ्यावे हे जाणून घ्या.

रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करण्यासाठी खा या ७ गोष्टी

फळे खा

आहारात पपई, अननस, किवी किंवा सफरचंद यांसारखी फळे खा. या सर्व फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे रोग प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक असते.

लसूण फायदेशीर आहे

लसूण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. त्यात अॅलिसिन नावाचा घटक आढळतो जो शरीराला संसर्ग आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतो.

भरपूर खा पालक

पालकामध्ये फोलेट असते. यातील फायबर, आयर्न, व्हिटॅमिन सी शरीराला प्रत्येक प्रकारे निरोगी ठेवते. शरीरात नवीन पेशी तयार करण्यासोबतच ते डीएनए दुरुस्त करण्याचेही काम करते.

एक वाटी दही खा

इम्यूनिटी मजबूत करण्यासाठी दही सुद्धा उत्तम आहे. त्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

हळद सर्वोत्तम

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हळद फायदेशीर आहे. हळदीचे पाणी, दूध किंवा चहा रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकते.

पौष्टिक आहे आवळा

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील उत्तम आहे. अर्धा चमचा आवळा पावडर एक चमचा मधासोबत सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास खूप फायदा होतो.

 

ज्येष्ठमध आहे उत्कृष्ट

ज्येष्ठमधमध्ये बरेच अँटी-व्हायरल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्येष्ठमधचा चहा घेतल्यामुळे सर्दी, खोकल्यासारख्या समस्या कमी होतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner