Health Care: गुलाबी थंडीचा सीजन म्हणजे हिवाळा. या हिवाळ्यात वातावरण असं तयार होते ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. हिवाळ्यात लोक जास्त लवकर आजारी पडू लागतात. पण असेही वातावरण असते ज्यामुळे तुम्ही अजून हेल्दी बनू शकता. अशावेळी प्रतिकार शक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी उत्तमोत्तम पदार्थ खाणे अत्यंत आवश्यक आहे. हिवाळ्यात आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचा बिघडलेला किंवा अयोग्य आहार. या थंडीच्या वातावरणात हेल्दी राहण्यासाठी भाज्या उपयोगी पडतील. हिवाळ्यात काही भाज्या कच्च्या खाव्यात, जेणेकरून तुमचे शरीर तंदुरुस्त राहते.- चला जाणून घेऊयात या भाज्यांची यादी...
हिवाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मुळा खाणे खूप गरजेचे आहे. मुळा कच्चाच खावा. याचे अनेक फायदे तुम्हाला मिळतील. सलाड म्हणून जेवताना तुम्ही मुळा खाऊ शकता.
बीटरूट हा फारच हेल्दी पर्याय आहे. बीटरूट अनेक फायदे देते. याचा वापर अनेक रेसिपीमधेही केला जातो. थंड हवामानात लोकांना आजारांपासून वाचवण्याचे काम बीटरूट करते. जर एखाद्याला ॲनिमियाचा त्रास असेल तर त्याने आवर्जून दररोज कच्चे बीटरूट खावे. याचा रसही तुम्ही पिऊ शकता.
ब्रोकोलीचा ट्रेंड गेल्या काही वर्षात आला आहे. ही भाजी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. महिला हिवाळ्यात सलाड म्हणून ब्रोकोली खाऊ शकतात.
हिवाळ्यात गाजर मुबलक प्रमाणत उपलब्ध असतात. अशावेळी याचा पुरेपूर वापर करायला हवा. अनेकांना थंडीच्या वातावरणात गाजर खायला खूप आवडते. त्यात बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए आढळते. डोळे निरोगी ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
पालकाची भाजी बनवून तर सगळेच खातात. सलाडच्या स्वरूपातही तुम्ही पालक कच्चा खाऊ शकता. हे शरीरासाठी सर्वोत्तम सुपरफूड मानले जाते. गर्भवती महिलांसाठी हे खूप फायदेशीर ठरते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)