Winter Care Tips: कोणताही ऋतू असो, आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. तिन्ही ऋतूंमध्ये व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो. विशेषत: हिवाळ्याच्या काळात आपली रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत असते, त्यामुळे आजारांचा धोका वाढतो. मात्र, तुम्हीही सिजनल आजारांना बळी पडत असाल तर आम्ही तुम्हाला काही सुपरफूड्सबद्दल सांगणार आहोत. हे सुपरफूड तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतातच सोबतीला शरीराचा विकास करण्यासही मदत करतात. हे रोज रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. चला तर जाणून घेऊयात अशा पदार्थांबद्दल सांगतो, जे आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात.
खजूर हे ऊर्जेचे भांडार आहे. जर तुम्ही खजुराचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास दुप्पट फायदे मिळतात. रोज दोन खजूर रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा आणि स्टॅमिना वाढतो. यासोबतच हे वजन कमी करण्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
रिकाम्या पोटी केळी आणि सफरचंद आवर्जून खावे. केळीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह असते. याशिवाय रोज एक सफरचंद खाल्ल्याने आजारही दूर राहतात. सफरचंदात भरपूर फायबर असते. पण हे अति खाणे टाळा.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. जर पपई रिकाम्या पोटी खाल्ली तर शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. याच्या मदतीने तुम्हाला बद्धकोष्ठतेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्यापासूनही आराम मिळेल.
कोणतेही ड्राय फ्रुट भिजवूनच खायला हवेत. भिजवलेले ड्राय फ्रुट खाल्ल्याने शरीराला अनेक फायदेही मिळतात. हे भिजवलेले ड्राय फ्रुट सकाळी रिकाम्या पोटी खा. ते निरोगी चरबी आणि प्रथिने समृद्ध आहेत जे शरीरात ऊर्जा वाढवण्यास मदत करतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)