Health Care Tips: जेवण झाली की अनेकांना काहीतरी गोड खावंसं वाटतं. अशावेळी सर्रास मिठाई, आईस्क्रीम, कुकीज, चॉकलेट खातात. हे पदार्थ तुमची गोडाची लालसा दूर होऊ शकते. पण या गोष्टी खाल्ल्याने शरीराला अनेक हानी होतात, फायदेशीर तर दूरच राहतात. म्हणूनच हे सगळे पदार्थ न खाता तुम्ही जेवण झाल्यावर गूळ खायला हवा. मोठ्यांच्या सल्ल्यानुसार मिठाई म्हणून जेवणानंतर गूळ खायला हवा. विशेषतः हिवाळ्यात गूळ खाणे खूप फायदेशीर ठरते. गूळ खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर उबदार राहते. याशिवाय काय फायदे होतात ते जाणून घेऊयात.
जेवणानंतर दररोज गुळाचे सेवन केल्यास शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघू शकते. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. मुलांना गुळ खाऊ घातल्याने त्यांची हाडे आणि स्नायू मजबूत होतात.
जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. ज्या लोकांना गॅस आणि अपचनाचा त्रास होतो त्यांनी तर रोज आवर्जून जेवणानंतर गूळ खावा. यामुळे अन्न पचण्यास मदत करतात.
रोज गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. गुळामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने शरीरात उबदारपणा येतो आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
गुळात पोटॅशियम असते जे मेटाबॉलिज्म फास्ट करते. गूळ खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यास बराच वेळ भूक लागत नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या