मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Curry leaves Benefits: रोज रिकाम्या पोटी खा कढीपत्ता, मिळतील आश्चर्यकारक फायदे!

Curry leaves Benefits: रोज रिकाम्या पोटी खा कढीपत्ता, मिळतील आश्चर्यकारक फायदे!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 22, 2024 10:39 PM IST

Health Care: जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी कढीपत्ता चावून खाल्ला तर तुम्हाला अनेक फायदे होतात.

Curry Leaves Benefits
Curry Leaves Benefits (Freepik)

Empty stomach eating curry leaves: आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजार होतात. या आजारावर गोळ्या औषध घेतल्यास त्याचे अजून दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे घरगुती उपाय उत्तम ठरतात. किचनमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. कढीपत्ता हा त्यातील एक. कढीपत्ता हा भारतीय स्वयंपाक घरात अगदी सहज आढळतो. कढीपत्ता पदार्थांत मिसळल्यावर त्याची चव आणि सुगंध बदलतो. जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी कढीपत्ता चावून खाल्ला तर तुम्हाला अनेक फायदे होतात. यामुळे याचा आहारात आवर्जून समावेश करावा. कढीपत्ता रोज चघळल्याने तुमची दृष्टी बर्‍याच प्रमाणात सुधारते. चला जाणून घेऊयात फायदे.

मिळतील हे फायदे

> कढीपत्ता तुमच्या ब्युटीला मेंटेन करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यास तुमच्या केसांची लांबी फास्ट वाढेल.

> याच्या सेवनाने केस गळणे बऱ्याच प्रमाणात कमी होते. तुमचे केस मऊ होतात.

Hair Care: कंबरेपर्यंत लांब आणि दाट केस हवे असतील तर आजपासूनच वापरा या गोष्टी!

> कढीपत्ता साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.

> कढीपत्ता चघळल्याने तुमचे शरीर नेहमी तंदुरुस्त राहते आणि तुम्ही आजारी पडत नाही.

> कढीपत्ता शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.

> कढीपत्ता चघळल्याने तुमचा ताणही बऱ्याच अंशी कमी होतो.

Hair Care: रिठा आणि शिककाईपासून घरीच बनवा शॅम्पू, केस गळती होईल कमी!

> वजन कमी करायचे असेल तर रोज कढीपत्त्याचे सेवन करावे.

> हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel