मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips: शेंगा, हिरवा कांदा चिरायला जास्त वेळ लागतो? फॉलो करा शेफ पंकजच्या या सोप्या टिप्स

Kitchen Tips: शेंगा, हिरवा कांदा चिरायला जास्त वेळ लागतो? फॉलो करा शेफ पंकजच्या या सोप्या टिप्स

Jan 04, 2024 08:35 PM IST

Vegetable Chopping Tips: हिवाळ्यात हिरवा कांदा किंवा कांद्याची पात आणि विविध शेंगा आवडीने खाल्ल्या जातात. पण हे चिरायला बऱ्याच महिलांना कंटाळा येतो. पण या टिप्स फॉलो करून तुम्ही सहज चिरू शकता.

शेंगा, हिरवा कांदा कापण्यासाठी टिप्स
शेंगा, हिरवा कांदा कापण्यासाठी टिप्स (freepik)

Easy Tips to Chop Beans and Spring Onion: आरोग्यासाठी हिरवे कांदे आणि बीन्स म्हणजे विविध शेंगा खूप फायदेशीर असतात. पण फक्त ते चिरायला खूप वेळ लागतो म्हणून तुम्ही ते घरी आणत नसाल तर आता काळजी करु नका. मास्टर शेफ पंकज यांच्या टिप्स फॉलो करुन तुम्ही हे सहज चिरु शकता. या टिप्स फक्त तुमचा वेळ वाचवत नाही तर तुम्ही चविष्ट भाज्याही खाऊ शकता. चला जाणून घ्या या टिप्स

ट्रेंडिंग न्यूज

बीन्स आणि हिरवे कांदे कापण्यासाठी फॉलो करा या टिप्स

बीन्स असो किंवा हिरवे कांदे कोणत्याही त्रासाशिवाय दोन्ही पटकन कापण्यासाठी तुम्हाला प्रथम टिश्यू पेपरची आवश्यकता आहे. आता बीन्स आणि हिरवे कांदे कापण्यापूर्वी ते टिश्यू पेपरमध्ये घट्ट गुंडाळा. यानंतर भाजी कापण्यापूर्वी टिश्यू पेपरमध्ये गुंडाळलेल्या बीन्स चॉपिंग बोर्डवर ठेवून कापण्यास सुरुवात करा. बीन्स पटकन आणि सहज चिरल्या जाईल.

 

हिरव्या कांद्याचे फायदे

- उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त.

- डोळ्यांसाठी फायदेशीर

- पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी गुणकारी.

- हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त

बीन्सचे फायदे

- बीन्सचे नियमित सेवन केल्याने पोट निरोगी राहते आणि पचनाच्या समस्या कमी होतात. याचे सेवन केल्याने गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटात मुरडा येणे यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.

- वजन कमी करण्यात उपयुक्त

- हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

- मधुमेहासाठी फायदेशीर

- कॅल्शियमचा चांगला स्रोत

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग