How many hours to use earphones: गॅजेट्समुळे आपलं जगणं सोपं झालं आहे. ते आपल्या आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग बनले आहेत की, त्याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटतं, असं म्हणायला हरकत नाही. खासकरून तरुणांमध्ये, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हातात फक्त गॅजेट्स असतात. सर्व गॅजेट्स आता आपली जीवनशैलीच बनले आहेत. ज्याशिवाय आपण आता जगू शकत नाहीत. यापैकीच एक म्हणजे इयरफोन होय. आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडे इयरफोन्स असतात. अनेकदा इयरफोन्समुळे लोक इतके गुंग होतात त्यांना आजूबाजूचं भानच राहत नाही.इयरफोन्स जितकं चांगलं आहे, तितकाच धोकादायकसुद्धा. आज आपण इयरफोन्सच्या वापराबाबत काही महत्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत.
आजकाल बस, मेट्रो किंवा अगदी रस्त्यावर चालताना अनेक तरुण इअरफोन घातलेले दिसतील. ते अनेकदा गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी आणि त्यांचे आवडते व्हिडिओ पाहण्यासाठी इअरफोन वापरतात. परंतु प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आहेत आणि काही तोटे देखील आहेत. फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, गुरुग्रामचे प्रधान संचालक (ईएनटी) डॉ. अतुल मित्तल यांनी लोकांना इअरफोन्सबाबत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत आणि त्याचे तोटेही सांगितले आहेत.
डॉ. अतुल मित्तल सांगतात की, इअरफोनचा वापर आपल्या कानांसाठी खूप हानिकारक ठरू शकतो. जर तुम्ही दिवसातून अनेक तास इअरफोन लावत असाल तर आता सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे, कारण असे करत राहिल्यास तुमची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. डॉक्टर म्हणतात की, इअरफोन घालणे ही आजकाल एक स्टाईल आणि फॅशन बनली आहे. परंतु जेव्हा तुम्ही ते कानात घालता तेव्हा उच्च तीव्रतेचा आवाज थेट कानाच्या आत पोहोचतो. ज्यामुळे तुमच्या कानाच्या केसांच्या पेशींना हळूहळू नुकसान होऊ शकते. इयरफोन्स सतत तासनतास वापरल्याने ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. आणि हळूहळू तुम्ही कर्ण बधीर होऊ शकता.
इतकंच नव्हे तर तुम्ही तुमच्या कानात जास्त वेळ इअरफोन लावत राहिल्यास तुमच्या कानात फंगल इन्फेक्शन होऊ शकते. तुम्हाला सुरुवातीला घाम आलेला लक्षात येईल. यानंतर त्याचे संक्रमणामध्ये रुपांतर होईल आणि कानाच्या आत सूज देखील येऊ शकते.
डॉ.अतुल मित्तल सांगतात की, अनेकांच्या मनात प्रश्न असेल की, दिवसातून किती तास इअरफोन लावायचे? ते म्हणाले की, मी डॉक्टर असल्याने मी कोणालाही इअरफोन घालण्याचा सल्ला देणार नाही. त्याचा वापर पूर्णपणे टाळावा. जर तुम्हाला संगीत ऐकायचे असेल, तर तुम्ही साउंड सिस्टम वापरा असे मी सुचवेन. तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असेल. अशाप्रकारे डॉक्टरांनी इअरफोन्सचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या