मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  गर्दीपासून दूर पळणाऱ्या लोकांसाठी दसरा सेलिब्रेशन प्लॅन, घरीच घ्या सुट्टीचा आनंद

गर्दीपासून दूर पळणाऱ्या लोकांसाठी दसरा सेलिब्रेशन प्लॅन, घरीच घ्या सुट्टीचा आनंद

Hiral Shriram Gawande HT Marathi
Oct 05, 2022 05:19 PM IST

Dasara Celebration Plans in Home : तुम्हाला सुद्धा फार गर्दी आवडत नसेल तर तुम्ही घरच्या घरी काही मोजक्या लोकांसोबत दसरा साजरा करु शकता.

घरी दसरा सेलिब्रेशन करण्यासाठी आयडिया
घरी दसरा सेलिब्रेशन करण्यासाठी आयडिया

Dasara Celebration Ideas for Introvert People : दसऱ्याला गरजेचे नाही की तुम्ही कुठेतरी फिरायला गेलेच पाहिजे. विशेषत: जर तुम्ही इंट्रोवर्ट टाइप असाल आणि घरी एकटे किंवा काही लोकांसोबत राहून कंपनी एन्जॉय करत असाल तर तुम्ही बाहेर जाण्याऐवजी घरीच उत्सव साजरा करावा. हे तुम्हाला अनावश्यक गर्दीपासून वाचवेलच, शिवाय तुम्ही थकणार देखील नाही. या दसरा सेलिब्रेशन आयडियाज अशा लोकांसाठी आहेत ज्यांना सुट्टीच्या दिवशी कुठेही जायला आवडत नाही.

एखादा खास पदार्थ

कोणताही उत्सव खाण्या-पिण्याशिवाय अपूर्ण असतो. त्यामुळे तुमच्या स्वयंपाकात हीच गोष्ट असेल, तर तुम्ही या दिवशी काहीतरी खास बनवा. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत खास डिश देखील बनवू शकता.

खेळ खेळा

रोजच्या धावपळीत तुम्ही अलीकडे क्वचितच कोणता गेम खेळला असाल. लहानपणी एकत्र येणे म्हणजे खेळ खेळणे, त्यामुळे आजच्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा असेल तर कुटुंबासह किंवा जोडीदारासोबत एखादा मजेशीर खेळही खेळू शकतो. कॅरमबोर्ड, लुडो, म्युझिकल चेअर किंवा अंताक्षरी असे खेळ तुमचा आनंद द्विगुणीत करु शकतात.

जुने कामे मार्गी लावा

जीवनाचा आनंद लुटण्याचा हा एकमेव मार्ग आहे असे आवश्यक नाही, परंतु तुम्ही तुमचे जुने प्रलंबित कामही मार्गी लावू शकता. जर तुम्हाला बुक शेल्फ साफ करायचा असेल किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार वॉर्डरोब लावायचे असतील तर तुम्ही यासाठीही वेळ देऊ शकता. जोडीदाराचीही मदत घेऊ शकता.

कॉफी आणि चॅटिंग

चॅटिंगचे नाव ऐकताच तुमच्या मनात फेसबुक किंवा व्हॉट्सअॅप चॅटिंग येत असेल तर आराम करा. स्वादिष्ट कॉफीचा आस्वाद घेताना जोडीदाराशी गप्पा मारल्या पाहिजेत. तुमच्या दोघांमध्ये कोणताही वाद असो किंवा तुम्हाला बोलायला वेळ मिळत नसेल, तर तुम्ही आजचा दिवस अशा प्रकारे साजरा करू शकता. तुम्ही कुटुंबासोबत देखील गप्पा मारू शकता.

फूड आणि फिल्म

तुम्ही एकटे राहता आणि चित्रपटांचे शौकीन असाल, तर तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर तुमच्या आवडीचा कोणताही चित्रपट पाहू शकता. तुमचे आवडते पदार्थ मागवा आणि चित्रपटाचा आनंद घ्या. या दरम्यान, स्क्रीन प्रिव्हेंशन (ब्लू कट एआरसी लेन्स) सह चष्मा घालण्यास विसरू नका. जेणेकरून स्क्रीन वेळेचा तुमच्या डोळ्यांवर फारसा परिणाम होणार नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग